मुंबई : Post Office Monthly Income Scheme:पोस्ट ऑफिस योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहेत, ज्यांना कमी जोखमीसह नफा हवा आहे. पोस्ट ऑफिस MIS ही अशी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करुन दर महिन्याला व्याजाच्या स्वरुपात लाभ घेऊ शकाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खात्याचे  (Post Office Saving Scheme) अनेक फायदे आहेत. हे खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावानेही उघडता येते. तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने हे खास खाते (Post Office Monthly Income Scheme) उघडल्यास, तुम्हाला दरमहा मिळणार्‍या व्याजासाठी तुम्ही शिकवणी फी भरु शकता. या योजनेची सर्व माहिती जाणून घ्या. 


खाते कुठे आणि कसे उघडायचे 


तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे पोस्ट ऑफिस खाते (Post Office Monthly Income Scheme Benefits) उघडू शकता. या अंतर्गत, किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतील. सध्या, या योजनेअंतर्गत व्याज दर (Post Office Monthly income Scheme Interest Rate 2021) 6.6 टक्के आहे.


- जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही हे खाते (MIS Benefits) त्याच्या नावाने उघडू शकता आणि जर ते कमी असेल तर त्याऐवजी पालक हे खाते उघडू शकतात. या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे. त्यानंतर ते बंद केले जाऊ शकते.


अशा प्रकारे कॅलक्युलेशन 


जर तुमचे मूल 10 वर्षांचे असेल आणि तुम्ही त्याच्या नावावर 2 लाख रुपये जमा केले तर दर महिन्याला तुमचे व्याज सध्याच्या 6.6 टक्के दराने 1100 रुपये होईल. पाच वर्षांत, हे व्याज एकूण 66 हजार रुपये होईल आणि शेवटी तुम्हाला 2 लाख रुपयांचा परतावा देखील मिळेल. अशा प्रकारे, एका लहान मुलासाठी, तुम्हाला 1100 रुपये मिळतील जे तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी वापरु शकता. ही रक्कम पालकांसाठी चांगली मदत होऊ शकते.


दरमहा 1925 रुपये मिळतील


या खात्याचे (Post Office Monthly income Scheme Calculator) वैशिष्ट्य म्हणजे ते एकल किंवा तीन प्रौढांसह संयुक्त खाते उघडू शकता. जर तुम्ही या खात्यात 3.50 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला सध्याच्या दरानुसार दरमहा 1925 रुपये मिळतील. शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी ही मोठी रक्कम आहे.


या व्याजाच्या पैशातून  (Post Office Monthly income Scheme For Children), तुम्ही शाळेची फी, शिकवणी फी, पेन-कॉपीचा खर्च सहज काढू शकता. या योजनेची कमाल मर्यादा म्हणजे 4.5 लाख जमा केल्यावर, तुम्ही दरमहा 2475 रुपयांचा लाभ घेऊ शकता.