Post Office KVP Scheme : अनेक जण आपले पैसे कसे सुरक्षित राहतील हे बघत असतात. त्याचवेळी पैस सुरक्षित ठेवताना त्यात वाढ होण्याची वाट बघत असतात. काही जण गुंतवणूक करुन आपले उत्पन्न कसे वाढेल हे पाहत असतात. मात्र,  पोस्ट ऑफिसची अशी एक सरकारी योजना आहे, ती तुमचे पैसे दुप्पट करेल. त्याचवेळी तुमचे पैसे बुडण्याचा कोणताही धोका नाही.  पोस्ट ऑफिसच्या  किसान विकास पत्र योजनेअंतर्गत, भारत सरकार तुमच्या गुंतवणुकीची हमी देते, जेणेकरुन तुम्हाला पैसे बुडण्याचा धोका सहन करावा लागणार नाही. KVP मध्ये एकट्याने किंवा संयुक्तपणे गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोस्ट ऑफिस डबल स्कीम योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ही गुंतवणूक योजना पैसे दुप्पट करेल. 1 एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारने किसान विकास पत्रावर मिळणारे व्याज 7.2 टक्क्यांवरुन वार्षिक 7.5 टक्के केले आहे. म्हणजेच, आता या योजनेत तुमचे पैसे अधिक वेगाने दुप्पट होतील. किसान विकास पत्र ही एकमेव सरकारी योजना आहे, जी हमीसह पैसे दुप्पट करते. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला डबल पैसे परत मिळतात. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्र (KVP) खरेदी करु शकता.


किसान विकास पत्राच्या माध्यमातून एकरकमी गुंतवणूक करु शकता. भारत सरकारची ही एकरकमी योजना आहे. या योजनेत तुम्ही निश्चित कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करु शकता. किसान विकास पत्र योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. ही योजना खास शेतकर्‍यांसाठी तयार केली गेली आहे. जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकालीन आधारावर बचत करु शकतील. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.


किती महिन्यात पैसे होतील डबल 


सरकारने 1 एप्रिलपासून या योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेत गुंतवणूक करुन तुम्हाला वार्षिक 7.5 टक्के दराने परतावा मिळत आहे. जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीत या योजनेतील पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागत होते. पण आता तुमचे पैसे त्याच्या आधीच्या पाच महिन्यांत म्हणजे 115 महिन्यांत म्हणजे फक्त 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होतील. जर तुम्ही त्यात 4 लाख एकरकमी ठेवले तर तुम्हाला 115 महिन्यांत 8 लाख परत मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचाही लाभ मिळतो. म्हणजेच व्याजावरही तुम्हाला व्याज मिळते. 


खाते उघडल्यावर सवलत


तुम्ही किसान विकास पत्रामध्ये केवळ1000 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करु शकता. यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. खाते एकल आणि ती प्रौढ एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकतात. यामध्ये नॉमिनी सुविधाही उपलब्ध आहे. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकतात. पालक अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो.