महागाईची झळ आधीच सर्वसामान्यांना बसत असताना आता त्यात आणखी भर पडणार आहे. कारण १ एप्रिलपासून तुमच्या आरोग्य विम्याचा प्रिमियम महाग होऊ शकतो. जवळपास १० टक्क्यांनी प्रिमियम वाढवले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे गेल्या वर्षभरात आलेले असंख्य क्लेम आणि IRDAI ने स्टँडर्ड नियम लागू केल्यानं विमा कंपन्यांनी प्रमियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ कंपन्यांना आधीच करायची होती, मात्र आता नव्या आर्थिक वर्षापासून ती लागू होण्याची शक्यता आहे.


का वाढू शकतो आरोग्य विम्याचा प्रिमियम?


  1. विमा नियमक IRDAI ने अनेक गंभीर आजारांचा समावेश आरोग्य विमामध्ये केला आहे. मानसिक त्रास, अनुवांशिक आजारांसारख्या आजारांचा पॉलिसीमध्ये समावेश झाला आहे.

  2. दुसरं कारण आहे वर्षभरात आलेले असंख्य कोरोना क्लेम. गेल्या वर्षभरात विमा कंपन्यांकडे १४ हजार कोटींचे क्लेम आलेले आहेत. ज्यातील ९ हजार कोटी विमाधारकांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांवर आलेला हा मोठा आर्थिक भार आहे.

  3. वैद्यकीय क्षेत्रात वाढलेला खर्च, ज्याला मेडिकल इन्फ्लेशनही म्हटलं जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात १८ ते २० टक्क्यांनी खर्च वाढला आहे.

  4. हॉस्पिटलमधील रूम रेंटचा खर्च. पहिले विमा कंपन्या रूम रेंटमध्ये बाकीचे खर्च जसं की चाचण्या वगैरेचा समावेश नव्हती करत. त्या गोष्टी वगळल्या जात. मात्र आता तसं करता येणार नाहीये. आता विमा कंपन्यांना रूम रेंटसोबत बाकीचे खर्चही उचलायचे आहेत. त्यामुळे याची वसुली प्रिमियम वाढवून केली जाऊ शकते.