President Murmu Statement : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu) नुकत्याच दोन दिवसांच्या गुजरात (Gujrat) दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी साबरमती आश्रमात (Sabarmati Ashram) जाऊन महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांना आदरांजली  वाहिली. यानंतर झालेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी एक वक्तव्य केलं. गुजरातमध्ये देशातील 76 टक्के मीठ तयार होतं त्यामुळे देशवासी गुजरातचं मीठ खातात असं म्हणता येईल, असं वक्तव्य राष्ट्रपती मुर्मू यांनी केलं होतं. (president draupadi murmu statement congress leader udit raj controversy tweet)


राष्ट्रपतींच्या वक्तव्यावरुन नवा वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतीने केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसने ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते उदितराज यांनी वादग्रस्त ट्विट केलं असून भाजपने उदित राज यांच्या वक्तव्याला दुर्दैवी ठरवत त्यांच्यावर आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. उदित राज यांनी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणं ही पहिलीच वेळ नसल्याचं भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. यावरुन त्यांची आदिवासीविरोधी मानसिकता दिसते अशी टीकाही संबित पात्रा यांनी केली आहे.


काँग्रेसचं वादग्रस्त ट्विट


काँग्रेस नेते उदित राज यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केलंय. अशा राष्ट्रपती कुठल्याही देशाला न मिळो चमचेगिरीचीही मर्यादा असते असं आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय. यानंतर उदित राज यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. माझं विधान वैयक्तिक आहे, काँग्रेस पक्षाचं नाही. द्रौपदी मुर्मूला उमेदवार बनवून आदिवासींच्या नावावर मते मागितली. आता राष्ट्रपती झाल्यावर त्या आदिवासी राहिल्या नाहीत का? वाईट वाटतं जेव्हा लोक SC/ST च्या नावाने पदावर जातात आणि नंतर गप्प होतात? असं उदित राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


उदित राज यांनी केलेल्या टीकेला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दल वापरण्यात आलेले शब्द चिंजाजनक आणि दुर्देवी आहेत. याआधी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनीही असं वक्तव्य केलं होतं, यावरुन काँग्रेस नेत्यांची मानसिकता कळते असं भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.