Toll Price Hike : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या वतीनं घेण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळं आता खर्चात आणखी भर पडणार आहे. कारण, सोमवारपासून टोल दरवाढ लागू होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना आता प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणूक संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा टोल दरवाढ लागू केल्यामुळं हा बदल पाहायला मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या बदलांनुसार सरसरकट 5 टक्क्यांनी ही टोल दरवाढ करण्यात आली असून, देशातील जवळपास 1,100 टोलनाक्यावर टोलचे नवे दर लागू असतील. 1 एप्रिलपासूनच ही टोल दरवाढ लागू होणं अपेक्षित होतं, पण लोकसभा निवडणुकांमुळं तसं होऊ शकलं नाही. ज्यामुळं इथं निवडणूक संपली आणि तिथं हे नवे बदल तातडीनं लागू करण्यात आले. 


हेसुद्धा वाचा : आजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार  'इतकी' किंमत 


वाहनांचा प्रकार जुने टोल दर नवे टोल दर 
कार, जीप, हलकी वाहनं 105 110
सामान वाहतूक, मिनी बस 170 175
ट्रक, बस  355 365
मोठी वाहनं 680 695