आजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार 'इतकी' किंमत

Amul Milk Price Latest News: निवडणुकीच्या निकालाआधीच महागाईची बातमी; दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ... जाणून घ्या आता किती किंमत मोजावी लागणार   

सायली पाटील | Updated: Jun 3, 2024, 07:44 AM IST
आजपासून दूध दरवाढ लागू; आता 1 लिटर दुधासाठी मोजावे लागणार  'इतकी' किंमत  title=
Amul Milk Price hike Latest News

Amul Milk Price Latest News: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election result 2024) निकालानंतर देशात अनेक गोष्टी बदलणार असून, देशाच्या अर्थसत्तेवरही त्याचे परिणाम होताना दिसणार आहेत. त्यापूर्वीच सामान्यांना चिंतेत टाकणारी आणि काहीशी निराशा करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे, जिथं खिशाला कात्री बसणार असल्याचं स्पष्ट होत आहे. 

देशभरात अमूल दुधाच्या किमती प्रति लिटरमागे दोन रुपयांनी वाढल्या असून, 3 जून 2024 पासून हे नवे दर लागू झाले आहेत. अमूल कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल, अमूल शक्ती या दुधाच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. देशभरात फक्त अमूलच नव्हे तर, येत्या काळात पराग, मदर डेअरी या संस्थांकडूनही दुधाच्या दरात वाढ केली जाणार आहे. 

दूध दरातील वाढ लागू केल्यानंतर अमूल गोल्डच्या किमती प्रति लिटर 66 रुपे, अमूल टी स्पेशल 64 रुपये आणि अमूल शक्ती 62 रुपयांवर पोहोचलं आहे. म्हणजेच अर्धा लिटर अमूल गोल्ड दूध आता 32 रुपयांना, 500 मिली अमूल स्टँडर्ड 29 रुपयांना, अमूल ताजा 26 रुपयांना आणि  अमूल टी स्पेशल प्रति 500 मिलिसाठी 30 रुपयांना उपलब्ध असेल. सध्याच्या घडीला फक्त दुधच नव्हे, तर अमूलचं दहीसुद्धा महाग झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार

 

1 एप्रिल 2023 म्हणजेच जवळपास 14 महिन्यांनंतर अमूल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आली आहे. यापूर्वीही दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले होते. गुजरात सहकारी दूध विपणन संघ (जीसीएमएमएफ) च्या माहितीनुसार गांधीनगर, सौराष्ट्र आणि अहमदाबाद येथील बाजारात शनिवारपासूनच दूध दरवाढ लागू झाली आहे. 

का झाली ही दरवाढ?

दूध दरवाढ काह झाली, यामागचं कारण सहसा कंपन्या स्पष्ट करत नाहीत. पण, यावेळी मात्र वाहतूक खर्च, उकाड्यामुळं पशुखाद्याची / चाऱ्याची कमतरता या आणि अशा काही कारणांमुळंच सध्या दूध दरवाढ लागू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. दूध उत्पादक संघ आणि सहकारी समित्यांकडूनही दूधविक्रीनंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरांत वाढ करण्याची मागणी केली, ज्यानंतर ही दरवाढ झाल्याचं लक्षात येत आहे.