नवी दिल्ली : आपली धरती, आपली परंपरा यामुळे एखाद्याच्या जीवनातील मोठं संकट दूर झालं. ही भारतवासियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. कोण भारतवासी नसेल की ज्याला याचा अभिमान नसेल? केवळ ओडिंगाजीच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोक आयुर्वेदापासून लाभान्वित होत आहेत, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन कि बात' या कार्यक्रमातून आपला अनुभव कथन केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केनियाचे माजी पंतप्रधान राईला ओडिंगाजी यांची मुलगी रोझमेरी हिला मेंदूचा ट्यूमर झाला. यासाठी त्यांनी मुलीवर शस्त्रक्रिया केली. पण, त्याचा दुष्परिणाम असा झाला की, रोझमेरीच्या डोळ्यांतील दृष्टि जाऊन आणि तिला दिसणं बंद झालं.


राईला ओडिंगाजी यांनी जगभरातील रूग्णालयांमध्ये इलाज केले. कन्येच्या इलाजासाठी त्यांनी जगातील मोठमोठे देश पिंजून काढले. पण, त्यांना यश मिळालं नाही. त्यांनी साऱ्या आशा सोडल्या. घरात निराशेचं वातावरण पसरलं होतं.


अशावेळी कुणीतरी त्यांना भारतातील आयुर्वेदाच्या उपचारांकरता येण्याचं सुचवलं. खूप उपाय करून थकलेले राईला आणखी एक प्रयत्न म्हणून ते भारतात आले. केरळात एका आयुर्वेदिक रूग्णालयात त्यांनी कन्येचे उपचार सुरू केले.


आयुर्वेदाच्या उपचारांमुळे रोझमेरीची दृष्टि बऱ्याच प्रमाणात परत आली. इथला एक नवं आयुष्य मिळालं. रोझमेरीच्या जीवनात पूर्ण कुटुंबात एक नवं प्रकाश परत आला. केनिया भेटीत राईला ओडिंगाजी यांनी त्यांच्या भेटीत भावनावश होऊन ही गोष्ट सांगितली. 


भारताच्या आयुर्वेदातील ज्ञान, विज्ञान केनियात नेण्याची इच्छा त्यांनी या भेटीत व्यक्त केली. ज्या प्रकारे वनस्पती आयुर्वेदासाठी कामाला येतात, तसं त्या वनस्पतींची शेती करून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याकरता पूर्ण प्रयत्न करतील असे ते म्हणाले.


ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा आयुर्वेदाचे मोठे चाहते आहेत. ते नेहमी आयुर्वेदाचा उल्लेख करतात. भारतातील अनेक आयुर्वेदिक संस्थांचीही त्यांना माहिती आहे, असे मोदी यांनी सांगितले.


गेल्या सात वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला आयुष स्टार्ट-अप चॅलेंज सुरू झाले असून या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.