नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 'स्वच्छ भारत' चे आवाहन केले. आपल्या भाषणांमधून वेळोवेळी ते 'स्वच्छ भारत' अभियानाची आठवण करून देत असतात. अनेक सेलिब्रेटींनाही त्यांनी यात सामिल करुन घेतले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेद्र मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोदींनी केलेल्या या कामाला 'स्वच्छ भारत अभियाना'शी जोडण्यात येत आहे. ज्या देशाला संबोधताना पंतप्रधान मोदी हे स्वत: किती तंतोतंत पालन करतात याचे उदाहरण त्यांनी दिल्याची चर्चा सगळीकड रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दसरा निमित्त दिल्लीतील सुभाष पार्कमध्ये पंतप्रधान मोदी हे रावण दहनाच्या कार्यक्रमात होते.  यावेळी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपाध्यक्ष वेंकय्या नायडू उपस्थित होते. दरम्यान पूजा विधी सुरू झाला. रामाचा अवतार धारण केलेल्या युवांना टीळा लावून मोदींनी पूजाअर्चा केली. 
त्यानंतर, मोदींना कोणीतरी टिशू पेपर दिला ज्याने मोदींनी आपले हात पुसले. आणि त्यानंतर तो टिशू पेपर टाकला नाही किंवा कोणालाही न देता आपल्या खिशात ठेवला.



 सोशल मीडियावर मोदींच्या या कामाच कौतुक होत आहे. मोदींच्या या कृत्याला स्वच्छ भारत अभियानाशी जोडण्यात येत आहे. सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडिओ अतिशय व्हायरल होतआहे. त्यावर सर्व स्तरातून प्रतिक्रीयाही येत आहेत.