हजारो किलोमीटर पायी प्रवास, रखरखतं उन, तरीही चेहऱ्यावर इतका ग्लो; राहुल गांधी म्हणाले...
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेसोबत कर्नाटकात आहेत
काँग्रेसचे (congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सध्या देशभरात निघालेल्या भारत जोडो यात्रेमुळे (bharat jodo yatra) चर्चेत आहेत. या यात्रेचे नेतृत्व खासदार राहुल गांधी करत आहेत. सध्या ही यात्रा कर्नाटकमध्ये (karnataka) असून देशभरात ही यात्रा जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) जनतेशी संवाध साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सोबतच ते भाषण, पत्रकार परिषदांमधून भाजपावर (bjp) टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यासुद्धा भारत जोडो यात्रेमध्ये चालताना दिसल्या होत्या.
राहुल गांधी भारत जोडो यात्रेत 14-15 किलोमीटर चालत असल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हापासून भारत जोडे यात्रेचा प्रवास सुरू झाला तेव्हापासून त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण रिकाम्या वेळेत राहुल काय करतात? असा प्रश्न त्यांना यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी विचारला होता. त्यावर राहुल गांधी यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.
या प्रश्नावर उत्तर देण्यापूर्वी राहुल गांधी आघी थोडेसे हसले आणि नंतर म्हणाले की, यात्रेतून मिळालेल्या वेळेत मी व्यायाम करतो, पुस्तके वाचतो, आई, बहीण आणि मित्रांशी फोनवर बोलतो. मी आईला विचारते ती काय करतेय? यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांना प्रवासादरम्यान थोडे हळू चालण्यास सांगितले जेणेकरून त्यांनाही त्याच वेगाने चालता येईल. यावेळी एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांना विचारले की, तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरता?
यावर राहुल गांधी यांनी टी-शर्ट काढून हात टॅन झाल्याचे दाखवले आणि सांगितले मी सनस्क्रीन वापरत नाही. मात्र आईने सनस्क्रिन लावायला पाठवले आहे. काही लोक म्हणाले की तुम्ही जरा हळू चालत जा. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सकाळी 6.30 पर्यंत प्रवास सुरू करतो आणि 11.30 किंवा 12.00 पर्यंत चालतो. जर आपण सावकाश चाललो तर तीव्र सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागेल. यावेळी भारत जोडो यात्रेचा आनंद घेत आहात का, असा प्रश्न राहुल गांधींनी सर्वांना विचारला, तेव्हा सर्वांनी हो म्हणत त्यांना पाठिंबा दिला.
दरम्यान, भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात आहे. राहुल गांधी आपला बहुतांश वेळ कर्नाटकात घालवत आहेत. बेल्लारी येथे जनतेला संबोधित करताना त्यांनी आपल्या कौटुंबिक जिव्हाळ्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की त्यांच्या आईने येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली होती. 1999 मध्ये सोनिया गांधी यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक बेल्लारी लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपने सुषमा स्वराज यांना उभे केले होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती. पण सोनिया गांधींनी निवडणूक जिंकली होती.