नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापकाच्या घरी धाड टाकली आहे. नोएडामधील प्राध्यापकाच्या घरी ही धाड घालण्यात आली आहे. शहरी नक्षल प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह पोलिसांनी जप्त केली आहे. प्राध्यपकाचं नाव हनी बाबू असं आहे. पोलीस सध्या घरात झाडाझडती घेत आहेत. पण पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान शुक्रवारी भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यास संशयित आरोपी अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी नकार दिला होता. अॅड. गडलिंग आणि सुधीर ढवळे माओवादी संबंध प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जुलै 2018 ला दोघांनी चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत, एल्गार परिषदेतील आम्ही प्रमुख घटक असून, काही महत्त्वपूर्ण गोष्टी आयोगासमोर आणू इच्छितो, असं म्हटले होते. त्यामुळे त्यांनी 6 सप्टेंबर रोजी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.