मुंबई : Tata Group Stock: रशिया युक्रेन युद्धाच्या तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये उतार चढ दिसून आली. त्यातही योग्य शेअरमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. असाच एक शेअर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. टाटा ग्रुपची कंपनी Titan company ltd चा शेअरबाबत ब्रोकरेज फर्मने सल्ला दिला आहे. स्टॉक मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्याकडेही या कंपनीचे शेअर काही वर्षांपासून आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.


टायटनमध्ये 14% तेजीची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टायटनच्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअऱसाठी 2900 ची लक्ष्य किंमत देण्यात आली आहे. 5 एप्रिल रोजी या शेअरची किंमत 2547 रुपयांच्या आसपास होती.


त्यामुळे सध्याच्या किंमतीवरून 353 रुपयांपर्यंतचा परतावा प्रति शेअरवर मिळू शकतो. टाटा ग्रुपचा हा शेअर याआधीही गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या पाच वर्षभरातील रेकॉर्ड पाहिल्यास 425 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा शेअरने मिळवून दिला आहे.


राकेश झुनझुनवाला यांचीही गुंतवणूक


भारतीय स्टॉक मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टायटनच्या शेअरचा सामावेश आहे. झुनझुनवाला यांच्याकडे 5 एप्रिल 2022 पर्यंत टायटन कंपनीचे 11535 कोटी रुपयांचे शेअर आहेत.  राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 37 शेअर्स आहेत. त्यात फायनान्स, टेक, रिटेल आणि फार्मा शेअर्सचा सामावेश आहे.