कोरोना युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर आज होणार निवृत्त
सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
नवी दिल्ली: भारताच्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या Coroanvirus लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे (ICMR) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर Raman Gangakhedkar यांच्या सेवेचा कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात होत आहे. त्यामुळे आज डॉ. रमण गंगाखेडकर निवृत्त होतील.
आनंदाची बातमी: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
मार्च महिन्यापासून भारतात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. डॉ. रमण गंगाखेडकर हे संसर्गजन्य रोगांवर अभ्यास करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेत साथ आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख होते. या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासाठी २०२० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले होते.
भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी
कोरोना व्हायरसने अमेरिका, इटली, स्पेन या देशांमध्ये अक्षरश: हाहा:कार उडवून दिला होता. प्रगत म्हणून गणल्या जाणाऱ्या या देशांतील आरोग्य यंत्रणा कोरोनामुळे पूर्णपणे कोलमडल्या होत्या. त्यामुळे भारतात कोरोना असाच विध्वंस करणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या काळात डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या साथीने कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याता मोठे योगदान दिले होते.