भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

लस विकसीत करतेवेळी कोरोना व्हाययरसशी संबंधित असणाऱ्या  SARS-CoV-2 स्ट्रेनला पुण्याच्या एनआयव्हीमध्ये विलगीकरण करत त्यानंतर भारत बायोटेककडे सोपवण्यात आलं.

Jun 30, 2020, 09:48 AM IST

लस विकसीत करतेवेळी कोरोना व्हाययरसशी संबंधित असणाऱ्या  SARS-CoV-2 स्ट्रेनला पुण्याच्या एनआयव्हीमध्ये विलगीकरण करत त्यानंतर भारत बायोटेककडे सोपवण्यात आलं.

1/6

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

coronavirus कोरोना व्हायरसमुळं सातत्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. सोबतच संशोधकही या विषाणूचा नायनाट करण्यासाठीची लस शोधण्यात सर्व मार्गांचा अवलंब करत आहेत. 

2/6

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

प्रयत्नांच्या याच साखळीमध्ये आता संशोधकांना यश मिळाल्याचं कळत आहे. त्यामुळं हा एक मोठा दिलासा असल्याचं म्हटलं जात आहे. भारतात कोरोनावरील ही पहिली लस विकसित करण्यात आली असून, लसीच्या मानवी चाचणीला परवानगी मिळाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी दिली. 

3/6

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

जुलै महिन्यामध्ये या लसीची क्लिनिकल ट्रायल घेतली जाणार आहे. भारत बायोटेकनं ही कोरोनावरील लस विकसीत केली आहे. 

4/6

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

मुळच्या हैदराबाद येथील असणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीनं कोव्हॅक्सिन COVAXIN ही लस विकसीत करत त्याला मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाल्याची माहिती दिली. आयसीएमआर आणि National Institute of Virology (NIV) यांचंही या लसीमध्ये योगदान आहे. 

5/6

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

लस विकसीत करतेवेळी कोरोना व्हाययरसशी संबंधित असणाऱ्या  SARS-CoV-2 स्ट्रेनला पुण्याच्या एनआयव्हीमध्ये विलगीकरण करत त्यानंतर भारत बायोटेककडे सोपवण्यात आलं.

6/6

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

भारत बायोटेक या कंपनीनं यापूर्वी पोलिओ, रेबिज, चिकनगुनिया, रोटाव्हायरस अशा विषाणूंवरही लसी विकसीत केल्या आहेत. त्यामुळं आता कोरोनावरील लसीच्या चाचणीवर साऱ्या देशासह जगाचंही लक्ष आहे ही बाब नाकारता येत नाही.