धक्कादायक! मैत्रीणीवर बलात्कार करुन बिल्डींगवरुन फेकलं
राजधानी दिल्लीमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रोहिणीमधील बेगमपूर भागात एका युवकाने २० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करुन नग्न अवस्थेत चौथ्या माळ्यावरुन फेकून दिलं. युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण आजुबाजुचे लोकं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. युवतीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असून आरोपीला अटक करण्यात आली.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रोहिणीमधील बेगमपूर भागात एका युवकाने २० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करुन नग्न अवस्थेत चौथ्या माळ्यावरुन फेकून दिलं. युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण आजुबाजुचे लोकं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. युवतीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असून आरोपीला अटक करण्यात आली.
युवती आणि युवक एकाच ठिकाणी कामाला होते. गुरुवारी युवकाने मित्रांसोबत भेटण्याचा प्लॅन केला. पीडित युवतीसह एक मुलगा आणि एक आणखी युवती होते. पण चौघेही एकाच गाडीवर होते म्हणून पोलिसांनी त्यांची गाडी जप्त केली. त्यानंतर चौघेही रिक्षाने घरी जायला निघाले.
आरोपीने दारुच्या नशेत युवतीला रिक्षातून उतरलं आणि वडिलांची गाडी घेऊन तिला घरी सोडतो असं सांगितलं. त्यानंतर इतर दोघे रिक्षानेच घरी निघून गेले. आरोपी युवतीला घेऊन त्याच्या घरी आला. त्यानंतर तिच्यावर त्याने बलात्काराचा प्रयत्न केला आणि मारहाण देखील केली. सध्या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची हालत खूपच नाजूक असल्याचं डॉक्टांनी सांगितलं आहे.