Video : काझिरंगामध्ये पहिल्यांदाच दिसला सोनेरी झळाळी असणारा दुर्मिळ वाघ; रुबाबदार चाल पाहतच राहाल
Kajiranga national park golden tiger : एकच नंबर; काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसला दुर्मिळ वाघ. ही दृश्य तुम्ही कधीही पाहिली नसतील.
Kajiranga national park golden tiger : आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. इथं येऊन महागाय गेंडा पाहत त्याचा अधिवास नेमका कुठं असतो याबाबतचं बारकाव्यानं निरीक्षण करण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. अशा या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये इतरही अनेक प्राणी आणि पक्ष्यांचा वावर आहे. अशा या राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक असा प्राणी दिसला, जो पाहताना अनेकजण थक्क झाले.
काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच दिसलेला हा लक्षवेधी प्राणी म्हणजे देशातील एकमेव सोनेरी झळाळी असणारा वाघ. सध्या सोशल मीडियावर याच वाघाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड शेअर केले जात असून, खुद्द आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनीसुद्धा या वाघाची एक झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली.
सोनेरी लकाकी असणाऱ्या या वाघाचा फोटो पाहिल्यानंतर पर्यावरणातील या आणि अशा अनेक घटकांचं महत्त्वं पटवून देण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. इतकंच नव्हे, तर सोनेरी वाघ आणि त्या वाघांचं महतत्वं, त्याची वैशिष्ट्य या आणि अशा अनेक गोष्टींसदंर्भातील माहितीवर अनेकांनीच चर्चा केली.
हेसुद्धा वाचा : Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
इंडियन फॉरेस्ट ऑफिसर (IFO) प्रवीण कासवान यांनीही सोशल मीडियाचा आधार घेत या वाघाला पाहून प्रत्येकजण हैराण झाल्याचं म्हटलं. 21 व्या शतकात अशा वाघाची झलक पाहायला मिळणं ही पहिलीच घटना असल्याचं ते इथं म्हणाले.
आसाममधील वाघांच्या एकूण संख्येविषयी सांगावं तर, 2018 मध्ये वाघांची संख्या वाढून ती 159 वर पोहोचली. 2021 मध्ये ही संख्या 200 वर पोहोचली. फक्त वाघच नव्हे, तर इतर प्रकारचे घातक प्राणीसुद्धा या राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळतात. त्यामुळं काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी आलं असता तुम्हीही काही दुर्मिळ प्राणी पाहण्याची संधी मिळवू शकता हे खरं.