Shampoos And Soaps Get Costlier : सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. गर्मीमुळे हैराण झालेले थंडाव्यासाठी दिवसातून अनेक वेळा अंघोळ करतात. मात्र, दिवसातून दहा वेळा आंघोळ करत असाल तर विचार करा. कारण, आता साबण आणि शॅम्पू, डिटर्जंट आता परवडणार नाहीत.  साबण, शॅम्पू, डिटर्जंटचे दर वाढण्याची शक्यता आहे. कच्चा माल सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलवर करवाढ प्रस्तावित आहे. ही कर वाढ लागू झाल्यास  साबण, शॅम्पू, डिटर्जंटच्या किंमती वाढणार आहेत. 


आंघोळ करणं, कपडे धुणं आता महागणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंघोळ करणं, कपडे धुणं आता महागण्याची शक्यता आहे. साबण आणि शॅम्पू, डिटर्जंटचे दर वाढण्याची शक्यता आहे. साबण निर्मितीसाठी लागणा-या कच्चा मालापैकी सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोलवर करवाढ सुचवण्यात आली आहे. याची अंमलबजावणी झाली तर या उत्पादनांच्या किंमती वाढणार आहेत. 


साबण उत्पादकांच्या संघटनेचा दरवाढीला विरोध


साबण उत्पादकांच्या संघटनेने या दरवाढीला विरोध केला आहे. सॅच्युरेटेड फॅटी अल्कोहोल हे मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंड या देशांमधून आयात केलं जाते. करवाढ झाली तर कंपन्यांना दर वाढवावे लागतीलच मात्र, वाढलेल्या उत्पादन खर्चाचा परिणाम या क्षेत्रातल्या नोक-यांवरही होण्याची भीती आहे. कंपन्या खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


कपडे धुण्यासाठी डिटर्जेंट वापरत असाल तर सावधगिरी बाळगा


डिटर्जेंट-साबणामुळे तुम्ही आजारी पडू शकता. डिटर्जेंटमध्ये केमिकल्सचा अधिक वापर केल्याने त्वचेसह डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन होऊ शकतं अस दावा केल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.  महिला सर्वाधिक डिटर्जेंटचा वापर करतात. कपडे धुण्यासाठी डिटर्जेंटचाच वापर करतात. त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण झाली होती. 


खरचं डिटर्जेंटमुळे आरोग्याला धोका पोहचतो का?


डिटर्जेंटमुळे डोळ्यांना, फुप्फुसांना इजा होत नाही.  कपडे धुताना पाण्यात जास्त वेळ राहू नये. हाताला जखम असल्यास डिटर्जेंटमुळे इन्फेक्शन होऊ शकते.  डिटर्जेंटमुळे सोरायसिस होण्याचा धोका नाही अशी माहिती समोर आली आहे.  डिटर्जेंटमध्ये काही केमिकल्स वापरले जातात. मात्र, असं असलं तरी कंपनी बनवताना सुरक्षेचा विचार करून बनवते. तरीदेखील डिटर्जेंट वापरताना खबरदारी घ्यावी असा सूचना देखील केल्या जातात.