मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) रेशन कार्डबाबत (Ration Card News) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोटी रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने एका बाजूला डिसेंबर 2022 पर्यंत मोफत अन्नधान्य देणार असल्याचं आधीच जाहीर केलं. 'वन नेशन वन रेशन' (One Nation One Ration) ही केंद्र सरकारची महत्त्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना देशभरात लागू झाली. यानंतर आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे. यामुळे आता रेशनधारकांना अचूक अन्नधान्य मिळेल. यामुळे मापात पाप होणार नाही. (ration card news now online electronic point of sale ie pos device is mandatory at all shops)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार (National Food Security Law), योग्य अन्नधान्य मिळावं, यासाठी रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल इलेक्ट्रॉनिक तराजूसोबत जोडण्यात यावं, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात संशोधन करण्यात आलं आहे. 


देशात नियम लागू


दुकानदार शिधा देताना काटा मारतात, मापात पाप करतात, अशा अनेक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. मात्र हा नियम लागू झाल्याने मापात पाप करण्याची शक्यताच नाहीशी झाली आहे.