Ration Card Latest News: निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मोठी घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश सरकार रेशनकार्डधारकांच्या सोयीसाठी धान्याबरोबरच आता पीठ देणार आहे. (Ration Card News) दरम्यान, यापूर्वी अनेक राज्य सरकारांनी लाभार्थ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. रेशन व्यतिरिक्त, सरकारकडून प्रत्येक शिधापत्रिकाधारकासाठी आयुष्मान कार्ड देखील बनवले जात आहे. जेणेकरून त्यांना मोफत उपचार मिळू शकतील.


राज्यातील एकूण 19.50 लाख नागरिकांना लाभ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे. तांदळाच्या प्रमाणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे सहा किलो तांदूळ मिळतील. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे एक हजार क्विंटल पिठाचा खप वाढणार आहे.( अधिक वाचा - बापरे, चीनकडे किती ही अण्वस्त्रे, बलाढ्य अमेरिकेचे उडालेत होश)


डिसेंबरपासून मिळणार13 किलो पीठ 


अन्न, नागरी आणि ग्राहक व्यवहार विभागाने डिसेंबरसाठी राज्यासाठी रेशनचे वाटप जारी केले आहे. चालू नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक शिधापत्रिकेवर लाभार्थ्यांना 12.5 किलो पीठ देण्यात आले. आता नव्या योजनेत डिसेंबरमध्ये 13 किलो पीठ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकांना अनुदानित रेशनमध्ये तीन डाळी, डाळ चना, 2 लिटर तेल (परिष्कृत आणि मोहरी), 500 ग्रॅम साखर आणि प्रति व्यक्ती एक किलो मीठ समाविष्ट आहे.


राज्य शासनाकडून लाभार्थ्यांना साखर, तेल आणि कडधान्ये आदींचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारकडून पीठ आणि तांदूळ दिला जात आहे. राज्य सरकारच्यावतीने खातेदारांना महिन्याच्या पहिल्या तारखेला (1 डिसेंबर) दुकानातून रेशन उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिमाचलमध्ये नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.