मुंबई : ATM Card आणि Credit Card ला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारे नवीन नियम घोषित करण्यात आले आहेत. 16 मार्च म्हणजे आजपासून हे नियम लागू होणार आहेत. अशातच तुम्ही आज एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड घेतलं असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. 


रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड घेतलं असेल आणि त्याचा वापर 15 मार्चपर्यंत केला नसेल तर ते कार्ड निकामी होणार आहे. या कार्डमधून 16 मार्च 2020 पासून इंटरनॅशनल ट्रान्झेक्शन स्वतःहून बंद होणार आहे. 


१६ मार्चनंतर या कार्डचा वापर जर तुम्हाला परदेशात करायाचा असेल तर कस्टमर केअरला फोन करून मोबाइल ऍप किंवा वेबसाइटद्वारे पुन्हा त्याची सेवा सुरू करू शकता. 


जर नवीन कार्डसाठी अप्लाय करत असाल तर कार्ड मिळाल्यानंतर इंटरनॅशनल ट्राझेक्शन, ऑनलाइन ट्रांझेशन, कार्ड नॉट प्रेझेंट ट्रान्झेशन आणि कॉन्टेक्टलेस ट्रान्झेनला स्वतःला अनेबल करावं लागणार आहे. 


कार्ड इश्यू करणाऱ्या कंपन्यांना सगळ्या कार्डधारकांचे व्यवहार सुरळीत चालावे याकरता मर्यादा ठरवण्याचे हक्क दिले आहेत. ही मर्यादा आंतरराष्ट्रीय, पीओएस, एटीएम, ऑनलाईन ट्रान्झेक्शनवर आधारित असणार आहे.  


डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत असल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे नियम लागू केले आहेत. 


युजर्स चोवीस तास, सात दिवसांत कोणत्याही वेळी कार्ड ऑन/ऑफ करू शकता. तसेच ट्रान्झिक्शन लिमिटमध्ये देखील बदल करू शकता. याकरता मोबाइल ऍप किंवा इंटरनेट बँकिंग, एटीएमआयचा वापर करू शकता.