RBI New Rule: ATM आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची मोठी बातमी, अन्यथा होऊ शकते फसवणूक
भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजेच RBI ने तुमच्या ATM डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्सच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
Tokenise Credit- Debit Card: भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजेच RBI ने तुमच्या ATM डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड्सच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ATM कार्ड्स आणि क्रेडिट कार्ड्स अधिक सुरक्षित करण्यासाठी RBI ने तुमच्या कार्ड्सला तात्काळ टोकनमध्ये बदलण्याचं आवाहन केलं आहे. नव्या नियमांप्रमाणे तुम्हाला तुमच्या ATM किंवा क्रेडिट कार्ड्सला टोकनमध्ये बदलणं गरजेचं आहे. यानंतर तुमची माहिती अधिक सुरक्षित होणार आहे.
टोकन सिस्टीमच्या वापराने तुमचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा डेटा टोकनमध्ये कन्व्हर्ट होतो. यानंतर तुमच्या कार्डबाबत महत्त्वाची माहिती तुमच्या डिव्हाइसमध्ये सुरक्षितरीत्या लपवून ठेवली जाते. RBI च्या माहितीनुसार टोकन बँकवर रिक्वेस्ट पाठवून तुम्ही तुमच्या कार्डला टोकनमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. यासाठी कार्डधारकाला कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही.
तुमचं कार्ड टोकनमध्ये बदलल्यानंतरही तुम्ही अगदी सहजतेने तुमच्या कार्डचा वापर करू शकतात. या प्रणालीमुळे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकतात. खास ग्राहकांच्या सुरक्षेसाठी RBI ने हा नियम बनवला आहे. एखाद्या ठिकाणी पेमेंट करताना सोपं जावं म्हणून तुमच्या कार्डची माहिती डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते. या प्रणालीमुळे तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती तुम्हाला कार्ड जारी करणारी कंपनी आणि नेटवर्कशिवाय कुणालाही समाजात नाही. आधीच तुमचा डेटा कुठे सेव्ह असेल तर तो हटवणे गरजेचं आहे.
कसं तयार कराल कराल कार्ड टोकन?
कोणत्याही ईकॉमर्स वेबसाईटवर जा. एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर पेमेंट ऑप्शनमध्ये जा
तुमचं कार्ड सिलेक्ट करा. पेमेंट करताना तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती आणि अतिरिक्त माहिती भरा
तुमचं कार्ड सिक्युअर करा, RBI च्या माहितीप्रमाणे तुमचं कार्ड टोकनाईज्ड करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार 'कार्ड सुरक्षित करा' हा ऑप्शन निवडा
टोकन क्रिएशनला ऑथॉराईज करा. पेमेंट पूर्ण करण्यासाठी मोबाईल किंवा ई-मेलवर आलेला OTP टाका.
यानंतर 'एक टोकन बनवा' यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या कार्डची माहिती एक टोकन स्वरूपात बदलेल
पुढील वेळेस नवं पेमेंट करताना तुमच्या सेव्ह कार्डमधील एक कार्ड निवडा. यावर तुमच्या कार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. म्हणजेच तुमचं कार्ड टोकानाइज्ड झालं आहे.
RBI says tokenise your ATM debit kard and credit card before 30 september