मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.


पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट नोटांची माहिती मिळण्यासाठी आणि जप्त करण्यासाठी आरबीआयने दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.


इतक्या रुपयांचा ठोठावला दंड


आरबीआयतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की, रिझर्व्ह बँकेने एक मार्च २०१८ रोजी एसबीआयवर ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 


आरबीआयच्या निर्देशांचं पालन झालं नाही


आरबीआयने सांगितलं की, बनावट नोटांसदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन एसबीआयकडून न झाल्याने हा दंड ठोठावण्यात आलाय. यासंदर्भात ५ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती.


आकड्यांनुसार, ३१ मार्च २०१७ पर्यंत एसबीआयच्या मुद्दाम पैसे परत न केलेल्या कर्जदारांची संख्या १,७६२ असून त्यांच्यावर २५,१०४ कोटी रुपये कर्ज आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर पीएनबी बँक आहे. त्यामध्ये १,१२० कर्जदारांवर १२,२७८ कोटी रुपयांचं कर्ज आहे. सार्वजनिक क्षेत्राच्या बँकाँच्या एकूण ८,९१५ कोटी कर्जदारांवर ९२,३७६ कोटी रुपये कर्ज आहे.