RBI Digital Currency:  गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल रुपीचा वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. क्रिप्टोकरन्सीच्या वाढतं प्रस्थ आणि जोखीम पाहता सरकारने अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने डिजिटल रुपी (Digital Rupee) लाँच करण्याची ब्लू प्रिंट तयार केली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून डिजिटल रुपी वापरली जाईल. यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्टही सुरू केला जाईल. 


Digital Currency vs Digital Rupee


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता नाही. पण रिझर्व्ह बँकेचा डिजिटल रुपी वैध असेल. क्रिप्टो करन्सीच्यचा मूल्यामध्ये चढ-उतार होत असतो. पण डिजिटल रुपयात असे काहीही होणार नाही. क्रिप्टोकरन्सीमागे कोणताही ठोस आधार नाही. त्याच वेळी, डिजिटल रुपी भौतिक नोटांच्या छपाईच्या बदल्यात एक वेगळी रक्कम म्हणून पर्याय असेल. रिझव्‍‌र्ह बँकही डिजिटल रुपयाच्या सुरक्षिततेसाठी वेगळी रक्कम ठेवणार आहे. कारण हा डिजिटल रुपया रिझर्व्ह बँकेचे दायित्व असेल. फिजिकल नोटची सर्व वैशिष्ट्ये डिजिटल रुपयांमध्ये देखील उपलब्ध असतील. लोकांना डिजिटल रूपीचे चलनी नोटात रूपांतर करण्याची सुविधा मिळेल. डिजिटल चलनासाठी वेगळे बँक खाते उघडण्याची गरज भासणार नाही.


Difference Between Digital Rupee And Digital Payment


डिजिटल रुपी आणि सर्वसामान्यांसाठी डिजिटल पेमेंट यात फारसा फरक असणार नाही. पण बँका आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत फरक असेल. कारण डिजिटल रुपया ही बँकांची जबाबदारी नसून ती रिझर्व्ह बँकेची जबाबदारी असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्याने बँकेत पैसे जमा केले असतील तर ते बँकेचे दायित्व आहे. कारण बँकेला हे पैसे ग्राहकांना मागणीनुसार परत करावे लागणार आहेत. पण डिजिटल रुपया ही बँकेची जबाबदारी नसून थेट रिझर्व्ह बँकेची जबाबदारी असेल. आणखी एक फरक म्हणजे डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज असणार नाही. बँकेत पैसे ठेवले तर त्याला व्याज मिळते. पण डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज असणार नाही. 


Post Office Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये या पदासाठी भरती, पगार महिना 81100 रुपयांपर्यंत


डिजिटल रुपी आणि चलनी नोटांमधला फरक काय?


डिजिटल पेमेंट सिस्टीममधील महत्त्वाचा दुवा UPI शी डिजिटल रुपी देखील जोडला जाईल. जेणेकरून लोक पेटीएम, फोनपे सारख्या इतर महत्त्वाच्या वॉलेटसह व्यवहार करू शकतील. जसे 10, 20, 50, 100, 500 च्या नोटा आहेत. एखादी व्यक्ती किती डिजिटल पैसे ठेवू शकते याची मर्यादा देखील निश्चित केली जाऊ शकते. डिजिटल चलनाने पेमेंट करताना गोपनीयता राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडक सरकारी एजन्सी वगळता, इतर कोणालाही डिजिटल रुपयाने केलेल्या व्यवहारांची संपूर्ण अचूक माहिती दिली जाऊ शकत नाही.


डिजिटल रुपीमुळे काय फायदे आहेत?


डिजिटल रुपीमुळे नोटांची छपाई, बँकांच्या शाखा, एटीएमपर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाचणार आहे. यासोबतच नोटा जळणे, कापणे, भिजणे या समस्यांपासूनही सुटका होईल. गेल्या आर्थिक वर्षात रिझव्‍‌र्ह बँकेला केवळ नोटा छापण्यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. उर्वरित वर्षासाठी, हा खर्च कमी होतो आणि छापलेल्या चलनाच्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे सेटलमेंटचा धोकाही कमी होईल. नव्या युगातील उद्योजकही त्यावर आधारित नवीन तंत्रज्ञान उत्पादने आणू शकतील.