India Post Recruitment 2022: सरकारी नोकरीसाठी अनेक जण तयारी करत असतात. त्यामुळे नोकरीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहात असतात. आता पोस्ट ऑफिस गुजरात पोस्टल सर्कलमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. मल्टी टास्किंग स्टाफ, पोस्टमॅन, पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसह अनेक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वर अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवार 22 नोव्हेंबर 2022 पूर्वी आपला अर्ज दाखल करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची यादी 6 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केली जाईल.
Postal Assistant and Sorting Assistant: उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण सुविधेतून किमान 60 दिवस मूलभूत संगणक प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या पदांवर नोकरी करणाऱ्यांना 25,500 रुपये ते 81100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.
Postman/Mail Guard: बारावीचे प्रमाणपत्र आणि गुजराती भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी, उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण केंद्रातून किमान 60 दिवसांचे मूलभूत संगणक प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या पदांवर नोकरी करणाऱ्यांना 21700 रुपये ते 69100 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
MTS: एमटीएस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. याशिवाय स्थानिक भाषेचीही संपूर्ण माहिती असावी.
1 नोव्हेंबरपासून होणार हे मोठे बदल, जाणून तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
कसा कराल अर्ज
Sports Qualification