Narayan Rane On Financial Crisis: कोरोनाच्या संकटातून देश सावरत असतानाच आता आणखी एक मोठं संकट देशावर घोंगावतंय. येत्या काही महिन्यात देशात आर्थिक मंदी (Financial Crisis In India) येण्याचा धोका आहे. या मंदीबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी गंभीर इशारा दिलाय. त्यामुळे आता तरुण युवकांनी देखील डोक्याला हात लावला आहे. भारतात देखील या मंदीचा फटका बसू शकतो. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं भाष्य केलंय. (Recession may hit India too Narayan Rane Says central government is trying hard to prevent)


काय म्हणाले नारायण राणे ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जूननंतर देशात आर्थिक मंदी (economic shutdown) येऊ शकते. सध्या सारं जग आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलंय. मंदीचा तडाखा भारतालाही बसू शकतो. मंदी रोखण्यासाठी केंद्र सरकार पुरेपुर प्रयत्न करत असल्याचंही राणेंनी सांगितलंय. एकीकडे राणेंनी मंदीचे संकेत दिले आहेत तर दुसरीकडे जागतिक नाणेनिधीच्या (IMF) अहवालानं सर्वांची झोप उडवलीय.


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संशोधन विभागानं दिलेल्या अहवालानुसार वाढती महागाई (inflation), व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अर्थव्यवस्था इतकी ढासळेल की तीन व्यक्तींमागे एकाची नोकरी (Job) जाईल असा इशाराही या अहवालात देण्यात आलाय. 2023 या वर्षात जगभरातील कोट्यवधी लोक बेरोजगार होण्याची भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलीय.


आणखी वाचा - Unseasonal Rain: "युद्धपातळीवर पंचनामे करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...", मुख्यमंत्री Eknath Shinde अ‍ॅक्शन मोडवर!


विशेष म्हणजे मागच्या महिन्यापासूनच जगभरात नोकरकपातीची (Laying Off) लाट आलीय. फेसबुक, ट्विटरपाठोपाठ अॅमेझॉनसारख्या (Amazon Laying Off) बड्या कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. 


जगात नोकरकपातीची लाट 


अॅमेझॉननं 18 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुरू केलीय. तर ट्विटरनं  3 हजार 700 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलंय. सीगेटमधून 3000 जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मायक्रोसॉफ्टमधून 1000 कर्मचा-यांना काढण्यात आलंय. स्नॅप चॅटमध्येही 20 % कर्मचारी कपात करण्यात आलीय. ई-कॉमर्स स्टार्टअप उडानमधून 350 नोक-या गेल्या आहेत. इंटेलमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचं संकट आहे. त्यामुळे आपली नोकरी जाऊ नये असं वाटत असेल तर काळजी घ्या, अनावश्यक खर्च टाळा, पैशांची बचत करा. नोकरीसोबत शाश्वत उद्योगांचीही कास धरा, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात.