Unseasonal Rain: "युद्धपातळीवर पंचनामे करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...", मुख्यमंत्री Eknath Shinde अ‍ॅक्शन मोडवर!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नाशिक (Nshik News) जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील  आखतवडे, निताणे, बिजोटे या गावांमध्ये अवकाळी पाऊस, जोरदार वारा आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

Apr 11, 2023, 21:00 PM IST

Eknath Shinde visits farmers: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी नाशिक (Nshik News) जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील  आखतवडे, निताणे, बिजोटे या गावांमध्ये अवकाळी पाऊस, जोरदार वारा आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

1/5

धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. बाबासाहेब उंबरदंड यांच्या शेतातील कलिंगड, ड्रॅगन फ्रुट, पिकांच्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

2/5

तुळजापूर तालुक्यातील मोर्डा शिवारात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली. श्रीमती सीताबाई सुरवसे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी सुरवसे दांपत्याला धीर दिला. त्यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

3/5

मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील वनकुटेमधील शेतांना देखील अवकाळी पावसाचा तडाका बसला होता. शासन शेतकऱ्यांसोबत असून तातडीने मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलीये.

4/5

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा. आतापर्यंत 10 हजार कोटी रुपयांच्या नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

5/5

पंचनामे पूर्ण झाल्यावर आठवडाभरात नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबांना 10 किलो गहू व तांदळाचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.