अखेर रिलायन्स एनर्जी अदानींच्या ताब्यात
तोट्यात असलेली रिलायन्स एनर्जी ही कंपनी तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने विकत घेतली आहे.
नवी दिल्ली : तोट्यात असलेली रिलायन्स एनर्जी ही कंपनी तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने विकत घेतली आहे.
तोट्यातली रिलायन्स एनर्जी
रिलायन्स एनर्जी ही अनिल धीरूभाई अंबानी गृपची कंपनी आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून रिलायन्स एनर्जी ही कंपनी तोट्यात सुरू होती. रिलायन्स एनर्जी वीज निर्मिती, वीज वहन आणि मुंबई परिसरात वीज वितरण या क्षेत्रात काम करते.
18,800 कोटींचा व्यवहार
अलिकडच्या काळातला ऊर्जा क्षेत्रातला हा सर्वात मोठा व्यवहार आहे. तब्बल 18,800 कोटी रुपयांना अदानी गृपने रिलायन्स एनर्जी ही कंपनी विकत घेतली आहे. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ही अदानी गृपची कंपनी ऊर्जा क्षेत्रातली एक महत्वाची कंपनी आहे.
अदानींची घौडदौड
या व्यवहारामुळे रिलायन्स एनर्जीचे 30 लाख ग्राहक अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला मिळणार आहेत. अदानी गृपची ऊर्जा क्षेत्रातली घौडदौड सुरूच असून याआधीही काही कंपन्या अदानींनी टेक ओव्हर केल्या आहेत.
रिलायन्स इन्फ्राचं भवितव्य
रिलायन्स एनर्जी ही कंपनी विकून अनिल धीरूभाई अंबानी गृपला आपलं 15,000 कोटींचं कर्ज फेडता येणार आहे. रिलायन्स इन्फ्रा ही बांधकाम, पायाभूत सुविधा या क्षेत्रात काम करणारी दुसऱ्या क्रमाकांची कंपनी आहे. या कंपनीकडे 10,000 कोटी रुपयांची कामं आहेत, अशी माहिती रिलायन्स इन्फ्राचे सीइओ अनिल जालन यांनी दिली.