Republic Day 2023 VIDEO: `बाज की नजर...`; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Republic Day 2023 VIDEO: भारताला मिळालेलं स्वातंत्र्य आणि त्यानं प्रजासत्ताक राष्ट्र (Republic Day 2023) म्हणून देशाची नवी ओळख या दोन्ही गोष्टींना आणि त्याची सुरुवात करणाऱ्या या दिवसांना देशाच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. पण, आपण आज हे दिवस साजरा करत आहोत, देशात मोकळेपणानं जगत आहोत त्याचं सर्व श्रेय देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येकाला जातं. मग ते स्वातंत्र्यसैनिक असो, देशाला लोकशाही राष्ट्र (Democracy) म्हणून आकार देणाऱ्या महान व्यक्ती असो किंवा देशाच्या सीमेवर सातत्यानं गस्त घालणारे सैनिक असो.
एएनआय या वृत्तसंस्थेनं नुकचाच एक व्हिडीओ (VIDEO) सर्वांच्या भेटीला आणला आहे. जो पाहून शब्दही सुचत नाहीयेत. देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा व्हिडीओ समोर आल्यामुळं त्याचं महत्त्वं द्विगुणित झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण, यामधील दृश्य अंगावर काटा आणत आहेत.
हेसुद्धा वाचा : Republic Day 2023 : कडक सॅल्यूट, VVIP च्या रांगेत मजूर.... कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा न्यारा रुबाब
दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर येथे असणाऱ्या भारतीय लष्कराच्या (Indian Army) अखेरच्या चौकीचा आहे. जिथं काही जवान हातात बंदुकी घेऊन सतर्क असल्याचं दिसत आहेत. शत्रूच्या हालचालींवर करडी नजर ठेवून दिसत आहेत. अतीप्रचंड हिमवृष्टी (Heavy Snowfall) होऊनही आपल्या साहसाच्या आणि चिकाटीच्या बळावर हे सैनिक देशाच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचं अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. नकळतच आपलाही हात त्यांना सॅल्यूट करण्यासाठी सरसावत आहे.
जवळपास 7200 फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या चौकीवर राहून तिथून देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या या सैनिकांना पाहून तुमच्यापैकी अनेकांचा ऊर अभमानानं भरून आला असेल.
जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण वातावरण (Jammu Kashmir news )
देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच जम्मू काश्मीरमध्ये मात्र तणावपूर्ण वातावरण कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं बुधवारी सैन्याकडून पुंछ सेक्टरमध्ये दोन दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रट्टा जब्बार आणि ढोबा या जंगलांमध्ये असणाऱ्या तळांना निशाणा करण्यात आलं आहे. यामध्ये दोन AK 47, तीन मॅग्जिन आणि 35 राऊंड बॉम्ब जप्त करण्यात आले.
कलई टॉप, शिंद्रे, रट्टा जब्बार आणि जवळपासच्या परिसरात हे अभियान हाती घेण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला या भागातील सर्व लहानमोठ्या हालचालींवर सैन्य आणि स्थानिक पोलिसांसोबतच सीमा सुरक्षा दलाचीही करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे.