Republic Day 2023 : कडक सॅल्यूट, VVIP च्या रांगेत मजूर.... कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा न्यारा रुबाब

Republic Day 2023 : दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेमका कसा साजरा होतोय प्रजासत्ताक दिन, कोणाची असेल प्रमुख उपस्थिती आणि यंदाचं वेगळेपण काय? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर   

Updated: Jan 26, 2023, 07:05 AM IST
Republic Day 2023 : कडक सॅल्यूट, VVIP च्या रांगेत मजूर.... कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा न्यारा रुबाब  title=
Republic Day 2023 chief guest theme and celebrations in delhi kartavya path

Republic Day 2023 : भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Indian Republic Day 2023) मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह न्याराच आहे. विविध राज्यांच्या चित्ररथासह इथं वायुदलाची (Idian Air Force) तब्बल 50 लढाऊ विमानं हवाई कवायती दाखवणार आहेत. शिवाय इजिप्तचे राष्ट्रपची अब्देल फतह अल-सीसी (Abdel Fattah El-Sisi) यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. पण, त्यापलीकडेही यंदाचा प्रजासत्ताक दिन अधिक खास असून, त्याचा रुबाब शब्दांच्याही पलीकडला आहे. का? पाहा... 

यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचं पथसंचलन म्हणजेच Republic Day Parade कर्तव्य पथावरून पुढे जाणार आहे. याआधी या स्थळाला (Rajpath) राजपथ म्हणून ओळखलं जात होतं. पण, यंदाच्या वर्षी केंद्र सरकारनं या स्थळाला नवं नाव देत कर्तव्य पथ (Kartavya Path) अशी नवी ओळख दिली. 

कर्तव्यपथावरील परेड पाहण्यासाठी येणाऱ्या VVIP ची जागा बदलली 

असं पहिल्यांदाच होणार आहे, जिथं यंदाच्या वर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पार पडत असणारी परेड मुख्य उपस्थिती असणारी मंडळी पहिल्या अर्थाच व्हीव्हीआयपी रांगेत बसून पाहणार नाहीयेत. तर, यंदाच्या वर्षी पहिल्या रांगेचा मान मजूर, रिक्षाचालक, फुटपाथवरील दुकानदार आणि कर्तव्य पथ साकारणारे सर्व मजूर यांना मिळत आहे. श्रमजीवी अशी ओळख त्यांना केंद्राकडून देण्यात आली आहे.

इजिप्तच्या सैन्यातील जवानही होणार सहभागी 

यंदा अग्निवीरही या परेडचा भाग आहेत. शिवाय या खास दिवशी इजिप्तच्या राष्ट्रपतींची उपस्थिती असून, त्यांच्या देशातील 120 सदस्यसुद्धा मार्चिंग परेडमध्ये दिसतील. यावेळी 21 तोफांची सलामी देताना 25 पाऊंडर बंदुकांच्या ऐवजी 105 MM स्वदेशी बंदुकीनं देण्यात येईल. हे देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असेल. हा दिवस नौदलासाठी खास असणार आहे कारण, आयएल 38 हे विमान 42 वर्षांनंतर निवृत्त होईल. 

हेसुद्धा वाचा : Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! मुंबईसह देशभरात तिरंगी रोषणाई

 

पुन्हा एकदा नारीशक्तीची झलक पाहणार देश 

यंदा Central Vista Project मध्ये सेवेत असणाऱ्यांनाही या परेडमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं आहे. शिवाय या प्रजासत्ताक दिनी नारीशक्तीचं प्रदर्शन संपूर्ण देश पाहणार आहे. परेडसाठी भारतीय वायुदलाच्या पथकाचं नेतृत्त्वं स्क्वाड्रन लीडर सिंधु रेड्डी करणार आहेत. याशिवाय इतरही अनेक तुकड्या अतिथींसमोर कडक सॅल्यूट देऊन पुढे जातील. यावेळी परेडमध्ये अशा अनेक तुकड्या असतील ज्यामध्ये महिलांचा समावेश असेल. शिवाय डीआरडीओ आणि माजी सैनिकांचं पथकही यावेळी सर्वांना पाहता येणार आहे.