7000 कोटींची FD, भारतातील सर्वात श्रीमंत गाव, रुपयामध्ये नाही तर डॉलरमध्ये पैसा कमावतात; यांचा व्यवसाय काय?
Richest Village Madhapar: जगातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या भारतात आहे. या गावात तब्बल 17 बँका असून, या बँकांमध्ये ग्रामस्थांची तब्बल 7 हजार कोटींची FD आहे.
Asia Richest Village : डोंगर, झाडी, टुमदार घरं, कच्चे पक्के रस्ते, एखादं छोटसं दुकान... गाव म्हंटल की डोळ्यासमोर वेगळचं चित्र उभ राहतं. पण, एका खेडेगावात, 17 बँका, शॉपिंग मॉल, थिएटर अशा सुविधा आहेत असं कुणी तुम्हाला सांगितले तर विश्वास बसमार नाही. पण आपल्या भारतात एक असं गाव आहे ज्याच्यापुढे एखादं शहरही फिकं पडले. भारतातील हे गाव जगातील श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावात राहणारे सर्वच जण करोडपती आहेत. या गावातील ग्रामस्थांची गावातच असलेल्या 17 बँकांमध्ये तब्बल 7 हजार कोटींची FD आहे. या गावातील लोकांचा व्यवसाय काय आहे? यांच्या उत्पन्नाचे माध्यम काय आहे? जाणून घेऊया भारतातील या सर्वात श्रीमंत गावाविषयी.
हे देखील वाचा... ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात
गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात भारतातील हे सर्वात श्रीमंत गाव आहे. माधापार असे या गावाचे नाव आहे. भारतातील अनेक गावांमध्ये अद्याप पायाभूत सोई सुविधा देखील पोहचलेल्या नाहीत. अशात गावात बँक असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. मात्र, या गावात तब्बल 17 बँंका आहेत. जगभरातील मोठ्या बँकाना इथं आपल्या शाखा सुरु करायच्या आहेत.
हे देखील वाचा... सूर्यास्त झाला, अंधार पडला, आता थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार; जगातील आश्चर्यकारक ठिकाण
या गावात एचडीएफसी, एसबीआय, पीएनबी, अॅक्सिस, आयसीआयसीआय , युनियन बँक आणि प्रमुख खासगी बँका मिळून तब्बल 17 बँंका आहेत. अजूनही काही बँका या गावात शाखा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. गावातील या 17 बँकांमध्ये तब्बल 7000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 2011 मध्ये या गावाची लोकसंख्या 17000 होती, जी आता 3200 वर पोहोचली आहे.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल
देशातील श्रीमंत गावांच्या यादीत या गावाचे नाव अग्रस्थानी आहे. या गावातील लोकांचा लंडनशी विशेष संबंध आहे. त्यातील निम्म्याहून अधिक लोक लंडन आणि युरोपमध्ये राहतात. या श्रीमंत गावातील लोकांच्या उत्पन्नाचे माध्यम काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. माधापर गावातील लोक परदेशातून पैसे कमवून गावातील बँकांमध्ये ट्रान्स्फर करतात. या गावातील प्रत्येक घरातील किमान 2 लोक परदेशात राहतात. परदेशात राहणारे हे लोक आपल्या गावातील नातेवाईंका पैसे पाठवतात
या गावातील ग्रामस्थांचा स्वतःचा शॉपिंग मॉल आहे, ज्यामध्ये जगभरातील मोठे ब्रँड आहेत. येथील लोक आजही शेती करतात. मात्र, परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा यांच्या खात्यात जमा होतो. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या भारतात आहे. आधीच इथं 17 बॅंका असताना जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.