VIDEO: ‘यांना फटके द्यायला पाहिजे!’ रशियन तरुणीला पाहताच म्हणाला 6000 INR! लोकांचा संताप
Russian Girl Harassed at Udaipur: उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये काय घडलाय प्रकार? जाणून घ्या.
Russian Girl Harassed at Udaipur: भारतात आलेल्या परदेशी मुलींना चिडवणे, त्यांच्याकडे पाहून घाणेरडे हातवारे करणे, त्यांची छेड कारणे असे प्रकार अनेकदा समोर येतात. गेल्या वर्षी परदेशी युट्यूबर तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. असाच एक प्रकार उदयपूर येथून समोर आला आहे. आपल्या देशात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणे ही आपली जबाबदारी असते. त्यांना असुरक्षित वाटेल अशी कोणते कृत्य घडू नये पण अशा घटनांमुळे यजमान देश म्हणून आपली मान शरमेने खाली जाते. उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये काय घडलाय प्रकार? जाणून घ्या.
उदयपूरला भेट देण्यासाठी आलेले प्रसिद्ध भारतीय युट्यूबर मिथिलेश बॅगपॅकर यांना एक धक्कादायक अनुभव आला. मिथिलेश यांच्या रशियन पत्नीकडे पाहून एका तरुणाने अश्लील कमेंट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिथिलेश हे आपल्या पत्नीसह उदयपूरच्या सिटी पॅलेसला भेट देण्यासाठी गेले असता ही घटना घडली. मिथिलेष यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचा व्हिडिओदेखील पोस्ट केला आहे. पोलिसांना या प्रकरणी कारवाई करावी असे आवाहन त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केल आहे.
मिथिलेश आपल्या पत्नीसह सात दिवसांपूर्वी उदयपूरला भेटायला आले होते. सिटी पॅलेसमध्ये ते स्वत:च्या कॅमेऱ्याने पत्नीचा व्हिडिओ बनवत होते. तेव्हा मागून एका तरुणाने 6000 रुपये म्हणत कमेंट केली. मिथिलेशला या गोष्टीचा खूप राग आला. मग त्याने त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरून कॅमेरा काढला आणि त्या तरुणाच्या दिशेने फिरवला. त्यानंतर मिथिलेशचा त्या तरुणाशी वाद झाला. पुढे मिथिलेशने पोलिसांना बोलवण्याची धमकीही त्यांना दिली.
अचानक घडलेल्या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेले सिटी पॅलेस सुरक्षा कर्मचारी तिथे पोहोचले. त्यांनी दोन्ही पक्षांची समजूत घालून परिस्थिती शांत केली. थोड्या वेळाने मिथिलेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला. 6 हजारांत रशियन असा घाणेरडा अर्थ निघणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात बनवून व्हायरल केले जातात. अशा व्हिडीओखाली खूप अश्लील आणि घाणेरडे मीम्सदेखील पाहायला मिळतात. फ्री इंटरनेटमुळे सोशल मीडियात पडीक असलेल्या तरुणांवर याचा परिणाम होत असतो. त्यांचा परदेशी मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. यामुळे मग रशियन तरुणींवर अशाच प्रकारच्या टिप्पण्या करण्याची हिम्मत होते. या सर्वात चांगल्या पाहुणचारासाठी
मिथिलेश यांनी अद्याप तरी या संदर्भात उदयपूर पोलिसांना कोणतीही लेखी किंवा तोंडी तक्रार दिलेली नाही. पण सोशल मीडिया पोस्टद्वारे पोलिसांकडून कारवाईची मागणी त्यांनी केली आली आहे. त्यामुळे पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.