Salary News : सोशल मीडियावर सध्या काही रील सातत्यानं ट्रेंड करताना दिसत आहेत. हे रील आहेत पगारवाढ, Appraisals आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाचे. 'एक अप्रेजल, पानी मे गयां... छपॅक...' अशा ट्रेंडमध्येही ही वस्तुस्थिती मार्मिक स्वरुपात मांडली जात आहे. मुळात हे रील चेहऱ्यावर हसू आणणारे असले तरीही त्यामध्ये असणारी वस्तूस्थिती खरी आहे, हे आता स्पष्टच झालं आहे. तेसुद्धा आकडेवारीसोबत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका सर्वेक्षणानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार पगारदार वर्गाचा यंदाच्या वर्षीही अपेक्षाभंग होणार असून, अपेक्षित पगारवाढीला (Salary Hike) अनेकजण मुकणार आहेत. खासगी क्षेत्रांतील नोकरीमध्ये सेवेत असणाऱ्या एका मोठ्या वर्गाला मिळणाऱ्या पगारवाढीचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहणार आहे. 2023 मध्ये पगारवाढीचा आकडा सरासरी 9.7 टक्के इतका होता. यंदाच्या वर्षी हीच सरासरी 9.5 टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकते. (Job News)


एऑन पीएलसीमधूनसमोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या सावटातून जग बाहेर येऊ लागलं तेव्हा, 2022 मध्ये समाधानकारक पगारवाढ झाल्याचं आकड्यांमार्फत लक्षात आलं. पण, त्यानंतर मात्र दोन आकडी पगारवाढ मिळण्यापासून एक मोठा नोकरदार वर्ग वंचित राहिला. भविष्यातही हे चित्र फारसं बदलणार नाही ही वस्तुस्थिती. जवळपास 45 खासगी उद्योग क्षेत्रांतील  1414 संस्थांमधून मिळालेल्या माहितीतून पगारवाढीसंदर्भातील ही आकडेवारी समोर आली. 


हेसुद्धा वाचा : Thane News : धक्कादायक! इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा शालेय सहलीदरम्यान विनयभंग


दरम्यान, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये नोकरी सोडण्याचं प्रमाण 18.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. यापूर्वी हा आकडा 21.4 टक्के इतका होता. यामधून नोकरीच्या संधींमध्ये असणारी मोठी स्पर्धा आणि त्यामध्ये होणारी घट या दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रकर्षानं समोर आल्या. 


कुठं होणार सर्वाधिक पगारवाढ? 


संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं सावट असतानाही भारतातील अनेक कंपन्यांनी सरासरी 9.5 टक्के पगारवाढ देण्याची तयारी दाखवली आहे. देशात येत्या काळात अर्थ विभाग, इंजिनिअरिंग, वाहन निर्मिती, एआय या आणि यासंबंधी काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये समाधानकारक पगारवाढ मिळण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, सध्या पगारवाढीचे दिवस पाहता पुढच्या काही महिन्यांमध्ये नोकऱ्या बदलणाऱ्यांचा आकडाही मोठा असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेव्हा आता कोण कंपनीची साथ कायम ठेवणार आणि कोण सोडणार हेसुद्धा येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.