मुंबई : सूर्यमालेत सर्वाधिक चंद्र असलेला शनी लवकरच पृथ्वीचा जवळ येणार आहे. 145 चंद्र असलेला सुंदर अशा शनी ग्रहाचं दर्शन आपल्याला होणार आहे. 31 ऑगस्टला सुपर ब्ल्यू मूनपूर्वी 27 ऑगस्ट 2023 शनी पृथ्वीच्या जवळ असणार आहे. ग्रहाभोवती गोल फिरणाऱ्या वादळी कड्यांमुळे अतिशय विलोभनीय असलेला शनी ग्रह दुर्बिणीने पाहता येणार आहे. खगोलशास्त्र प्रेमींसाठी ही एक मजेवानीच ठरणार आहे. (saturn planet close to earth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

27 ऑगस्ट 2023 शनी पृथ्वीच्या जवळ आणि सूर्याच्या अगदी समोर असणार आहे. या स्थितीला खगोलशास्त्रात प्रतियुती असं म्हटलं जातं. या प्रतियुतीमध्ये शनी आणि पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतर कमी होणार आहे. अशा स्थितीत शनीची सुंदर कडी आपल्याला पाहता येणार आहे. ही कडी साध्या डोळ्यांनी पाहता येणार नाही पण दुर्बिणीच्या मदतीने या दुर्मिळ क्षणाचा आनंद घेता येणार आहे. 



या दिवशी शनी ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळणार आहे. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसणार आहे. अशा स्थितीत हा ग्रह रात्रभर काळसर आणि पिंगट रंगाचा आणि चमकदार दिसणार आहे.