मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI डाटा प्रोटेक्शन ऑफिसर या पदासाठी भरती सुरु केली आहे. ही नोकरी करारावर दोन वर्षांसाठी असणार आहे. या नोकरीसाठी 23 जून 2020 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड होणार आहे. भारतीय स्टेट बँकने, कोणताही उमेदवार पात्र असल्यास, त्याला पॅकेजची चिंता करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकेकडून सुरु करण्यात आलेल्या या भरतीसाठी, उमेदवाराची निवड झाल्यास मुंबई किंवा देशातील कोणत्याही भागात उमेदवाराची नियुक्ती केली जाऊ शकते. या पदासाठी अर्ज करण्यास वयोमर्यादा 55 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे. 


अरेरे! पेन्शनच्या पैशांसाठी १०० वर्षांच्या आजींना खाटेवरुन खेचत बँकेत नेण्याची वेळ


 


या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्याकडे सर्टिफाइड इन्फॉर्मेशन प्रायव्हसी प्रोफेशनल, सर्टिफाइड इन्फॉर्मेशन प्रायव्हसी टेक्नोलॉजी, सर्टिफाइड इन्फॉर्मेशन प्राइव्हसी मॅनेजरची प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. एप्रिल 2020 पर्यंत कमीत-कमी 15 वर्षांचा अनुभव असण्याबाबतही सांगण्यात आलं आहे. 


चीनशी लढताना शहीद झालेले 'ते' भारतीय जवान कोण?


आयटीसंबंधी ज्ञानासह, माहितीसह डेटा प्रायव्हसी लॉ अँड रेग्युलेशन अँड सिक्योरिटी एरियाबाबतही माहिती असल्यास, अर्जदारास प्राथमिकता दिली जाऊ शकते.


इच्छूक उमेदवार https://bank.sbi/careers आणि https://www.sbi.co.in/careers या लिंकवर अर्ज करु शकतात, अधिक माहिती घेऊ शकतात. 


भारतीय आणि चिनी सैनिक आमनेसामने; जाणून घ्या आतापर्यंत काय काय घडले?