SBI खातेदारांसाठी खूशखबर! आता WhatsApp वरून करू शकता ही कामं
SBI New Service: तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण बँकेत या कामासाठी तुम्हाला वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअॅपवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
SBI WhatsApp Services: स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत कोट्यवधी लोकांची खाती आहेत. मात्र बँकेत गेल्यावर कामं लवकर होत नाही, अशी खातेदारांची तक्रार असते. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खातेदारांसाठी एक सेवा सुरु केली आहे. त्यामुळे खातेदारांचा बँकेत जाण्याचा वेळ वाचणार आहे. पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना यापुढे शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. कारण बँक आपल्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर Hi हा मेसेज सेंड केल्यावर पेन्शन स्लिप पाठवणार आहे. दुसरीकडे, पेन्शनधारकांना दरवर्षी हयात असल्याचा पुरावा बँकेला द्यावा लागतो. आता हयात असल्याचा पुरावा सादर करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट (VLC) सेवा सुरू केली आहे. त्यामुळे बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाने काय ट्वीट केलं आहे?
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. एसबीआय खातेदारांना आता कधीही आणि कुठेही पेन्शन स्लिप मिळू शकेल, असे बँकेनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. पेन्शन स्लिप मिळविण्यासाठी, SBI ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 9022690226 या क्रमांकावर Hi टाइप करून WhatsApp करावे लागेल. व्हॉट्सअॅपवर HI हा मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपवर पेन्शन स्लिप पाठवली जाईल. पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनर किंवा पेन्शनधारकाच्या बचत किंवा चालू खात्यात जमा केलेल्या पेन्शन पेमेंटचा तपशील असतो.
बातमीची वाचा- कर्जावर घेतलेली कारची चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही? जाणून घ्या काय आहे नियम
व्हॉट्सअॅप सेवा मिळविण्यासाठी नोंदणी आवश्यक
व्हॉट्सअॅपवर पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी, SBI ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 9022690226 वर HI पाठवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला SBI कडून एक संदेश येईल. यामध्ये तुम्हाला शिल्लक माहिती, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिप माहितीसाठी 3 पर्याय दिले जातील. याशिवाय तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर माहिती मिळवण्याचा पर्यायही दिला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाची व्हॉट्सअॅप सेवा मिळविण्यासाठी, तुम्हाला प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.