कर्जावर घेतलेली कारची चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही? जाणून घ्या काय आहे नियम

Stolen Car Loan: जर तुम्ही लोनवर घेतलेली कार चोरीला गेलं तर कर्जाच्या हफ्त्याचं काय होतं? EMI भरायचा की नाही जाणून घ्या

Updated: Nov 17, 2022, 06:30 PM IST
कर्जावर घेतलेली कारची चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही? जाणून घ्या काय आहे नियम title=

Car Loan EMI: नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या काही जणांची इच्छा दारात नवी कोरी कार असावी अशी असते. पण तुटपुंज्या कमाईत महागडी कार घेणं प्रत्येकालाच परवडतं असं नाही. अनेक जण गाडी घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतात. अनेक जण कार लोन (Car Loan) घेण्याचा पर्याय निवडतात. स्वस्त कारची किंमत 4 ते 5 लाखांच्या घरात आहे. जर लोन (Loan) आणि ईएमआयचं (EMI) गणित बसलं की, मग गाडी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतात. प्रिंसिपल अमाउंट भरल्यानंतर गाडी दारात उभी राहते आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यास सुरुवात होते. दर महिन्याला न चुकता गाडीचा ईएमआय भरला जातो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? कर्जाचे हफ्ते फेडण्यापूर्वीच गाडी चोरी (Car Theft) झाली तर..अशा स्थितीत ईएमआय भरणं गरजेचं असतं की, त्यातून सुटका होते? याबाबत अनेकांना संभ्रम आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकं काय करावं लागतं?

ईएमआय भरावा लागणार की नाही?

तुम्ही तुमची कार लोनवर घेतली असेल तर तुम्हाला ईएमआय भरावाच लागतो. म्हणजेच गाडी चोरीला गेली तरी कर्ज फेडावंच लागतं. अशा स्थितीत इंश्युरन्स क्लेम कामी येऊ शकतं. जर तुमच्या इंश्युरन्स पॉलिसीमध्ये चोरीचा क्लेम कव्हर होत असेल, तर तुम्ही क्लेम करू शकता. त्यानंतर इंश्युरन्स कंपनी तुमच्या कारची IDV (Insured Declared Value) आधारे लोनचं पेमेंट करेल. लोन भरल्यानंतर क्लेममधून जी अमाउंट उरते ते पैसे तुम्हाला मिळतात.

बातमी वाचा- रिक्षामध्ये Airpod विसरली होती तरुणी, ड्रायव्हर जे केलं ते वाचून तुम्हीही म्हणाल... 

इंश्युरन्स कंपनीला बँकेकडून घेतलेल्या लोनची माहिती असते का?

जेव्हा तुम्ही इंश्युरन्स पॉलिसी घेता, तेव्हा तुमच्या कारवर कर्ज आहे की नाही हे विमा कंपनीला माहिती असते. कारण कर्ज देणाऱ्या बँकेचे नाव  कारवर कर्ज घेतले आहे त्या कारच्या आरसीवर नोंदवलेले असते. त्यामुळे कार चोरीला गेल्यास विमा कंपनी तुमच्या दाव्याच्या आधारे कर्जाचे पैसे पहिल्यांदा बँकेला देते. पण, तुमचा दावा नाकारला गेल्यास, तुम्हाला कर्जाची रक्कम भरावी लागेल. तुम्ही कर्जाचे हफ्ते चुकवल्यास बँक तुमच्यावर कारवाई करू शकते आणि दंडही ठोठावू शकते.