SBI Server Down : UPI, Net Banking सर्वकाही बंद; तुम्ही SBI चे खातेधारक आहात का?
SBI Server Down : देशातील बऱ्याच विश्वसनीय बँकांपैकी एक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांना बऱ्याच मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळं खातेधारकांवर ही वेळ ओढावली आहे.
SBI Server Down : देशातील सर्वाच मोठी public sector bank अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँताचा सर्व्हर आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजेच सोमवारीच बंद पडला आणि याचे थेट परिणआम बँकेच्या ऑनलाईन सेवा, युपीआय आणि योनो अॅपवर झाले. अनेकांचे आर्थिक व्यवहार अडकले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खातेधारकांनी संतप्त ट्विट करत हे आमच्यासोबतच होतंय की आणखी कुणासोबतही होतंय? असे प्रश्न केले. (SBI UPI Net Banking Yono Not Accessible due to Server Down trends on social media )
बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला उल्लेख करत बऱ्याच खातेधारकांनी नेमकं काय सुरुये? असा थेट सवालच बँकेला केला. काहींनी बँकेच्या ऑनलाईन सेवा आज सकाळपासूनच बंद असल्याची तक्रार केली, तर काहींनी मात्र गेल्या दोन दिवसांपासून बँकेच्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये अडचणी येत असल्याचं स्पष्ट केलं.
हेसुद्धा वाचा : PM Modi Degree: मोदींच्या शिक्षणावरुन राऊतांचा टोला! म्हणाले, "त्यांची Entire Political Science ची डिग्री..."
नेमकं काय झालं होतं?
1 एप्रिल रोजी स्टेट बँकेकडून खातेधारकांना उद्देशून एक माहितीपत्रक जारी करण्यात आलं होतं. वार्षिक खातेपडताळणीसाठी एसबीआयच्या ऑनलाईन सुविधांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. यासाठी वेळेची मर्यादाही बँकेकडून सांगम्यात आली होती. पण, तो एक दिवस वगळता पुढील दिवसही सेवांमध्ये अडचणी आल्यामुळं खातेधारकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सोशल मीडियावर ज्यावेळी खातेधारकांनी त्यांच्या अडचणी उचलून धरल्या त्यावेळी बँकेकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली नाहीत. हा मुद्दाही अधोरेखित करत बँकेकडून अधिकृत माहिती देणारं ट्विटही करण्यात आलेलं नाही, असं म्हणत काही नेटीझन्सनी एसबीआयलाच धारेवर धरलं.