श्रीनगर : दहशतवाद्यांविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांचं ऑपरेशन ऑलआउट सुरु झालं आहे. लष्कर खोऱ्यात युवकांना मुख्यधारेत आणण्यासाठी प्रयत्न करते आहे. तर दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन देखील सुरु आहे. पुलवामामध्ये जवळपास 20 गावांमध्ये सर्च ऑपरेशन सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षारक्षकांकडून जवळपास 20 गावांमध्ये हे सर्च ऑपरेशन सुरु झालं आहे. या गांवामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय जवानांना माहिती मिळाली आहे की, काश्‍मीर खोऱ्यात मोठ्य़ा प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. मागील महिन्यात अनेक स्थानिक तरुण देखील दहशतवादी संघटनेत गेले.


लष्कर, सीआरपीएफ आणि स्‍थानीय पोलीस यांनी एकत्र येत पुलवामामध्ये गांवांना घेरलं आहे. खूपच गतीने हे सर्च अभियान चालवलं जात आहे. पुलवामाच्या कुचेपुरा, मुरान, द्रबगाम, मेत्रीगाम, पुत्रीगाम, गूसू या गावांमध्ये हे अभियान सुरु आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपिया भागात अनेक दहशतवादी सक्रिय आहेत. 


1 सप्टेंबरला बांदीपोरामध्ये सुरक्षारक्षकांनी 3 दहशवताद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणाक शस्त्रसाठी देखील हस्तगत केला होता. या दरम्यान 1 जवान शहीद देखील झाला होता. शोपियामध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या एका टीमवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 4 पोलीस शहीद झाले होते.