बलात्काराच्या आरोपात दुसरा बाबा गजाआड
बलात्कार प्रकरणात गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम हा नजीकच्या काळातला दुसरा अध्यात्मिक गुरू ठरला आहे.
नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम हा नजीकच्या काळातला दुसरा अध्यात्मिक गुरू ठरला आहे. 2013 साली आसाराम बापूविरोधात एका अल्पवयीन मुलीनं आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर कोर्टात हजर न झाल्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता, इंदूरच्या आश्रमाबाहेर त्याच्या भक्तांनी धिंगाणा घातला होता.
सध्या आसाराम बापू आणि त्याचा मुलगा नारायण साई याच्यावर बलात्काराचे खटले सुरू आहेत. दोघंही कोठडीत आहेत. रांमरहिमला दोषी ठरवल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.