मुंबई : शेअर बाजाराने या वर्षी रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवले आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये 21 टक्के आणि 23 टक्क्यांपर्यंत ग्रोथ पहायला मिळाली आहे. सेंसेक्स तब्बल 10 हजार अंकांनी वाढला आहे तर, निफ्टी 14 हजारापासून ते 17 हजारपर्यंत पोहचला आहे. ओवरऑल 80 टक्के शेअर्समध्ये  तेजी दिसून आली आहे. काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी रिटर्न मशीन ठरले आहेत.  8 महिन्यात त्यांनी 430 टक्के म्हणजेच 5 पटीपर्यंत रिटर्न दिले आहेत. बाजाराच्या तेजीमध्ये गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Majesco
Majesco मायक्रोकॅप कॅटेगिरीचा शेअर आहे. या शेअरने यावर्षी 430 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. एका वर्षात हा शेअर 16 रुपयांनी वाढून 82 रुपयांवर पोहचला आहे.


Balaji Amines
Balaji Amines मिडकॅप सेगमेंटमधील शेअर आहे. या शेअरने  आतापर्यंत 350 टक्के रिटर्न दिला आहे. एका वर्षात शेअरची किंमत  925 रुपयांनी वाढून 4156 वर पोहचली आहे.


Poonawalla Fin
 Poonawalla Fin च्या शेअर्समध्ये या वर्षी दमदार तेजी दिसून आली आहे. शेअरने या वर्षी 330 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. या दरम्यान शेअरची किंमत  40 रुपयांनी वाढून 173 रुपये झाली आहे.


Adani Total Gas
Adani Total Gasने या वर्षी 300 टक्के रिटर्न दिला आहे.  1 जानेवारीपासून आतापर्यत या शेअरचा भाव 375 रुपयांनी वाढून 1512 रुपये झाला आहे.


 Saregama India
 Saregama India च्या शेअर्सने या वर्षी 287 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारी पासून आतापर्यंत या शेअरमध्ये 835 रुपयांची वाढ झाली आहे. या शेअरची किंमत सध्या 3231