7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video
Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...
Jawan Tickets Theater Video : सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अनेकांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी नवनवीन टॉपिकवर व्हिडीओ तयार करावे लागतात. कोणी गाण्यावर व्हिडीओ तयार करतं तर कोणी एखाद्या प्रसंगावर. अशातच आता एक प्रासंगिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू देखील आवरलं नाही. कारण पोरांनी तयारीच एवढी भन्नाट केलीये. नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये? पोरांनी असा लुक केलाय तरी का? 7 सप्टेंबरला आहे तरी काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah rukh khan) बहुप्रतिक्षीत चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरेल, असं निर्मात्यांकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आता शाहरुखच्या जवान सिनेमाची उत्सुकता सर्वजण बघत आहेत. तर किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी जे काही केलं, ते पाहून तुम्हीही खदाखदा हसाल.
दोन तरुण थेटरमध्ये जातात आणि तिकीट विक्रेत्याला सिनेमाची दोन तिकीटं मागतात. त्यावेळी विक्रेता कोणत्या सिनेमाची? असा सवाल करतो. त्यावेळी त्या दोघांचे चेहरे दिसतात. या दोन्ही पठ्ठ्यांनी जवान सिनेमामधील शाहरूखचा लुक केलेला आहे. डोळ्यावर आणि डोक्यावर पट्टी बांधलेला असा लुक या दोघांनी केलाय. त्यामुळे कोणत्या सिनेमाची तिकीटं पाहिजे? असा प्रश्न पडूच नये. सध्या हा व्हिडीओ तुफान ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसतंय.
पाहा Video
दरम्यान, शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाला चांगला रिव्ह्यू मिळाल्यानं आनंदी झाले आहेत. त्यामुळे जवान सिनेमा 'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल विचारला जातोय. शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटानं जगभरात 1050 कोटींची कमाई केली. त्यानंतर आता जवान देखील हिट ठरेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे एकाच वर्षात शाहरुखचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडणार की काय याकडे सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.