नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शिला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. बराच काळ आजारपणातून चाललेल्या शिला दीक्षित यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यांचे पार्थिव आज दुपारी 2.30 मिनिटांनी दिल्लीतील निगमबोध घाट येथे नेण्यात येईल. याआधी दुपारी 12 ते 1 या वेळेत काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सरकारतर्फे आणि दिल्लीमध्ये 2 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आजारी असलेल्या शिला दीक्षित यांना शनिवारी सकाळी दिल्लीतील एस्कार्ट रुग्णालयात भरती करण्यात आले. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात आणले गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असताना पुन्हा एकदा ह्दयविकाराचा झटका आला. संध्याकाळी 3.55 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. शिला दीक्षित यांच्या अंतिम दर्शनासाठी शनिवारी निजामुद्दीन येथील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी तसेच सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते पोहोचले होते.