Children's Day 2022: कोणत्याही प्रश्नाचे उत्तर किंवा माहिती शोधण्यासाठी आपण क्षणाचाही वेळ न दवडता गुगल (Google) करतो. सोशल मीडिया जगतातील प्रसिद्ध सर्च इंजिन म्हणून गुगलकडे पाहिले जाते. मात्र या गुगलकडून युजर्सला (google users) केवळ माहिती न देता त्यांचे  मनोरंजन करण्यासाठी काही खास दिवशी गेमिंग किंवा नॉर्मल डूडल (doodle) शेअर केले जाते. यातून एक महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. याचपार्श्वभूमीवर आज (14 नोव्हेंबर) Google ने बालदिनाचे औचित्य साधून एका खास डूडलद्वारे साजरा करत आहे. ज्यामध्ये कोलकात्याच्या विद्यार्थ्याने श्लोक मुखर्जीने (Shlok Mukherjee) बनवलेल्या पेंटिंगचे प्रदर्शन करून विजेता घोषित करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलाकृती स्पर्धेचे आयोजन


गुगलतर्फे यंदाच्या कलाकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारतातील 100 शहरातील इयत्ता 1 ते 10 वीच्या मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेला 115,000 हून अधिक प्रवेशिका मिळाल्या. या स्पर्धेची थीम "पुढील 25 वर्षात, माझा भारत कसा असेल" असा होता.  त्यावर कोलकाता येथील श्लोक मुखर्जीला प्रथम स्थान मिळाले आहे. त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून 'भारताची वैज्ञानिक प्रगती' या विषयावर पुढील 25 वर्षांचे चित्रण केले आहे. चला जाणून घेऊया बालदिनानिमित्त बनवलेले खास का आहे.  


वाचा : बालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया… 


गुगलचे खास डूडल


हे डूडल Doodle4Google स्पर्धेचे विजेते श्लोक मुखर्जी (Shlok Mukherjee) यांनी तयार केले आहे. श्लोक मुखर्जी यांनी तयार केलेले हे खास डूडल आज (14 नोव्हेंबर) संपूर्ण दिवस गुगल इंडियाच्या होम पेजवर दिसणार आहे. Google आज 2022 च्या डूडल फॉर Google स्पर्धेच्या विजेत्याच्या कलात्मक कार्यासह साजरा करत आहे. या स्पर्धेत देशातील 1,15,000 मुलांनी आपल्या प्रवेशिका पाठवल्या. ज्यामध्ये श्लोक मुखर्जीने बनवलेल्या डूडलला सर्वाधिक मते मिळाली. विजेत्याच्या घोषणेनंतर Google ने आज आपल्या मुख्यपृष्ठावर ठेवले आहे. 


वाचा : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल


श्लोकाचे डूडल काय दर्शवते?


येत्या 25 वर्षांत माझ्या भारतातील वैज्ञानिक मानवतेच्या भल्यासाठी पर्यावरणपूरक रोबोट्स बनवतील. भारत पृथ्वीपासून अंतराळापर्यंत अनेक प्रवास करेल. भारत योग आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात आणखी प्रगती करेल आणि येत्या काही वर्षांत अधिक मजबूत होईल असे या पेंटिंगच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. 


Doodle 4 Google Contest म्हणजे काय?


ही Google द्वारे आयोजित केलेली वार्षिक स्पर्धा आहे. जी विविध देशांमध्ये साजरी केली जाते. या स्पर्धेत प्रत्येक देशातील शाळकरी मुले सहभागी होतात आणि त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन करतात. या स्पर्धेतील विजेत्याचे गुगल डूडल गुगलच्या होमपेजवर ठेवण्यात आले आहे. 


या स्पर्धेतील विजेत्याला त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी Google कडून $30,000 शिष्यवृत्ती, त्यांच्या स्वतःच्या डूडलसह एक टी-शर्ट, एक Google Chromebook आणि एक डिजिटल डिझाइन टॅबलेट दिला जातो. 


गुगलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विजेत्यांचे डूडल ट्विट केले आहे. लहान मुलांची सर्जनशीलता आणि कल्पकता पाहून आपल्याला धक्का बसतो असेही सांगितले. विशेषतः सामान्य थीमवर आधारित डूडलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाखाणण्याजोगा आहे. गुगलने यंदाच्या राष्ट्रीय विजेत्या श्लोकचे प्रेरणादायी डूडल निवडले आहे.


श्लोक मुखर्जी यांनी त्यांच्या डूडलमध्ये भारताला केंद्रस्थानी ठेवले असून पुढील 25 वर्षांत माझे भारतीय शास्त्रज्ञ पर्यावरणपूरक रोबोट विकसित करतील जे मानवतेच्या भल्यासाठी असतील. भारत सातत्याने अंतराळवीरांना अवकाशात पाठवत आहे. तसेच, योग आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात भारत आगामी काळात अधिक मजबूत होईल.