बालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया…

Children’s Day 2022:  दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या बालकांसाठी स्पेशल बनवून त्यांना खुश करा...  

Nov 14, 2022, 09:19 AM IST

Children's Day Special : भारतात दरवर्षी  14 नोव्हेंबर रोजी बाल दिन (Children’s Day 2022) म्हणून साजरा करण्यात येतो.  देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांना स्मरण करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी बालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या बालदिन तुमच्या मुलांसाठी खास बनवायचा असेल तर  जाणून घ्या या भन्नाट आयडिया... 

1/5

बालदिनानिमित्त घरी मुलांसाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवा. त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवल्यानंतर ते आनंदित होतात. आणि त्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस खास बनून जातो. त्यामुळे बालदिनी मुलांच्या आवडीची डिश बनवू शकता किंवा नवीन रेसिपी वापरून पाहू शकता.

2/5

जर तुम्ही आपल्या बालकांसाठी काही विशेष सरप्राईज गिफ्ट आणून देत असाल तर ते खुश होतील. कारण मुलांना सरप्राईज गिफ्ट खूप आवडतात. छोट्यातली छोटी गोष्ट देखील त्यांना आनंदी करू शकते. गिफ्ट देऊन त्यांचा हा दिवस अविस्मरणीय करा.  

3/5

बाल दिनानिमित्त आपल्या बालकांसह आवडणारे चित्रपट किंवा कार्टून बघा. त्यांच्यासोबत आपण देखील लहान होऊन जातो. त्यांच्या आवडीचा चित्रपट अथवा कार्टून बघण्याचा आनंद त्यांच्यासोबत घ्या. जेणेकरून ते अधिक तुमच्यासह जवळीक साधतील, आणि आनंदित राहतील. 

4/5

या दिवशी तुम्ही मुलांसोबत दुपारच्या जेवणासाठी बाहेर जाऊ शकता आणि तिथे त्यांच्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर देऊ शकता. 

5/5

बालदिनाच्या निमित्ताने आपल्या बालकांना कुठेतरी फिरायला घेऊन जा. त्यांच्या आवडत्या ठिकाणी आपण फिरण्याचा बेत आखू शकता.