काकांच्या मुलीच्या प्रेमात पडण्याचे परिणाम धक्कादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ओरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली.
मुंबई : आपल्याला अशी अनेक लोक बाहेर पाहायला मिळतील, ज्यांचे लग्न होऊन देखील, त्यांचे बाहेर एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम जुळतं. परंतु हे प्रेम जेव्हा जिवावर उठतं, तेव्हा मात्र सगळ्याचाच विनाश होतो. आपल्या बाकोला सोडून कुटुंबातील मुलीवर प्रेम करणं या तरुणाला भलतंच महागात पडलं. कारण यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण मेरठमधील आहे. या तरुणाचे नाव शाबुद्दीन आहे. शाबुद्दीनच्या मृत्यूनंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुणी आपल्याला हे सांगताना दिसत आहे, की शाबुद्दीनच्या मृत्यूची प्लानिंग तीन दिवसांपूर्वीच तिच्या नातोवाईकांनी केली.
हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ओरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी करायला सुरुवात केली.
हा व्हिडीओ शाबुद्दीनच्या सख्या बहिणी केला आहे. ज्यानंतर तिने पोलिसांना सांगितले की, तिचा भाऊ आणि त्याची पत्नी यांच्यातील वादामागचे कारण त्यांच्या काकांची मुलगी कारणीभूत आहे.
तिच्या काकांची मुलगी शाबुद्दीनशी सतत फोन करायची आणि भेटायला बोलवायची. ज्यामुळे शाबुद्दीनचं देखील त्या मुलीवर प्रेम जडलं, ज्यामुळे तो आपल्या बायकोलाही सोडून आला. परंतु या दोघांच्या प्रेमाला त्यांचे घरचे समजून घ्यायला तयार नव्हते, ज्यामुळे त्यांनी वेगळं राहण्याचं ठरवलं.
शाबुद्दीनच्या बहिणीनं सांगितलं की, शाबुद्दीन आणि काकांची मुलगी 3 महिन्यांपासून एकत्र राहात होती. ज्यानंतर तिच्या काकांनी आणि काही जवळच्या मंडळींनी मिळून शाबुद्दीनला मारण्याचा प्लान आखला.
इन्स्पेक्टर जानी संजय वर्मा यांनी सांगितले की, यापूर्वी शहाबुद्दीनवर हल्ला केल्याप्रकरणी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी शाबुद्दीनच्या मृत्यूनंतर खटल्यात कलम 302 देखील लावण्यात आला.
आता या प्रकरणी पाचही आरोपींचा शोध सुरू आहे. एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या निर्बंधानंतरही शाबुद्दीनने काकांच्या मुलीला भेटणे थांबवले नाही. त्यावरून शाबुद्दीनला तीन दिवसांपूर्वी मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली होती. ज्यामुळे उपचारादरम्यान बुधवारी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणात संपूर्ण तपास करत आहेत.