मुंबई : सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे. जिथे सतत काहीतरी व्हायरल होत असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे कन्टेन्ट पाहायला मिळतात. यामुळेच येथे एकदा का एखादा व्यक्ती आला की, त्याचा तासन तास कसा निघून जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही. खरंतर सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. यासाठी ते आपल्या जिवाची पर्वा देखील करत नाहीत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो आश्चर्यचकित करणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक कंटेंट क्रिटर एकदम नवीन मोबाइल हातात घेऊन उभा असलेला दिसत आहे. हा मुलगा प्रथम हातातील फोन सुरु असल्याचा पुरावा सर्वांना देत आहे, त्यासाठी तो आपला फोन चालवून देखील दाखवत आहेत.


त्यानंतर मुलगा प्रथम कॅमेऱ्याची फ्रेम मोबाईलच्या दिशेने दाखवतो. ज्यामध्ये त्याच्या हातात अगदी नवीन मोबाईल स्पष्टपणे दिसत आहे. परंतु पुढच्याच क्षणी तो आपल्या नवीन मोबाईलवर जोरदार दगड आपटतो. यामुळे मोबाईलचा डिस्प्ले लगेचच तुटल्याचे दिसून येते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओमधील हा मुलगा मोबाईल तोडताना पाहून तुम्हाला धक्काच बसेल, पण पुढच्याच क्षणी जे घडलं ते त्याहूनही धक्कादायक आहे. कारण डिस्प्ले तुटल्यानंतर मोबाईलमधून अचानक जोरदार धूर येऊ लागला आणि दुसऱ्याच क्षणी त्याला आग लागली. मोबाईलला आग लागल्याचे पाहून हा तरुण त्या भागातून लांब पळला. प्रसिद्धीसाठी या तरुणाने आपल्या नवीन फोनची देखील पर्वा केली नाही. 
         
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आला आहे, ज्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.