COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Father Daughter: एक बाप आपल्या मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी खूप काही करत असतो. पण मुलांच्या जिवाचा प्रश्न आला की तोच बाप आपला जीव गमवायला मागेपुढे पाहात नाही. तो नेहमी त्यासाठी तयार असतो. कारण आपल्या मुलांना कोणाताही त्रास होऊ नये, हाच त्यामागे त्याचा प्रामुख्याने उद्देश असतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे उघडतील. सोशल मीडियावर रस्त्यावर दररोज अपघातांचे व्हिडिओ पोस्ट केले जातात, मात्र हा व्हिडिओ अपघातातून वाचल्याचा आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक रस्त्यावर उभे असल्याचे दिसत आहे. पण या सगळ्यांनाही इथे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. 


अशा प्रकारे मुलीचा जीव वाचवला


या व्हिडिओमध्ये एक कार भरधाव वेगाने रस्त्यावर जाताना दिसत आहे. काही सेकंदांनी एक मुलगी सायकलवरुन येताना दिसते. पण तिच्या सायकलचा वेग खूपच होता आणि त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सगळ्यात आधी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ जरुर पाहा...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ViralHog (@viralhog)


मोठा अपघात टळला


चिमुरडी सायकलवरुन अती वेगात येत होती. मुलगी लोखंडी खांबाला धडकणारच हे वडीलांना दिसताच जीवाची पर्वा न करता सायकलच्या वेगाने तेही पळू लागतात आणि मुलीला सायकलवरुन उचलून कडेवर घेतात. त्याचवेळी सायकल लोखंडी खांबाला धडकते. चांगली गोष्ट म्हणजे मुलीला बापाच्या दक्षतेमुळे कोणतीही दुखापत झाली नाही आणि तिचा जीव वाचला. अनेक यूजर्स हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकलेले नाहीत.


व्हिडिओ व्हायरल झाला


या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळत आहेत. आत्तापर्यंत लाखो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) हा व्हिडिओ पाहिला आहे आणि हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. काही लोक वडिलांना सुपरहिरो तर काही मुलीला तू भाग्यवान आहेस असे सांगत आहेत.