Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकरण दररोज नवनविन खुलास होत आहे. आरोपी आफताबची (Aaftab Poonawala) पॉलीग्राफ टेस्ट (Polygraph Test) करण्यात आली असून 1 डिसेंबरला त्याची नार्को टेस्ट (Narco Test) होणार आहे. दरम्यान, याप्रकरणात आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडचीही (Aaftab Girfreind) चौकशी करण्यात येत आहे. आफताबने श्रद्धाची निर्घृण हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर तिला जबर धक्का बसला आहे. आफताब इतका क्रुरकर्मा असू शकतो यावर तिचा विश्वास बसत नाहीए. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबचं दुसऱ्या एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण सुरु झालं. पण आफताबच्या वागणं किंवा बोलण्यातून त्याने इतकी क्रुर कृत्य केल्याचं कधीच जाणवलं नसल्याचं त्या मुलीने पोलिसांना सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी भेट झाली दुसऱ्या गर्लफ्रेंडशी
दिल्ली पोलिसांनी त्या मुलीकडून श्रद्धाची अंगठी हस्तगत केली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाची अंगठी त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला गिफ्ट केली होती.  Bumble App आफताब आणि त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची ओळख झाली होती. ती मुलगी psychologist आहे. आफताबने एके दिवशी त्या मुलीला त्याच फ्लॅटवर भेटायला बोलावलं होतं, ज्या फ्लॅटमध्ये त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. पोलिसांनी जेव्हा त्या मुलीला चौकशीसाठी बोलावलं, तेव्हा आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचं तिला कळलं आणि तिला मोठा धक्का बसला. 


श्रद्धाला करायचं होतं आफताबशी ब्रेकअप
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाला आफताबशी ब्रेकअप करायचं होतं. पण ही गोष्ट आफताबला आवडली आणि रागाच्या भरात त्याने श्रद्धाची निर्घृण हत्या केली. आफताबचं वागणं आणि त्याच्या मारण्याला श्रद्धा वैतागली होती. त्यामुळे आफताबला सोडण्याचा तिने निर्णय घेतला होता. 3 किंवा 4 मेला ती आफताबपासून वेगळं होणार होती. 


हे ही वाचा : Shraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर


12 नोव्हेंबरला आफताब अटकेत
आफताब पुनावालाने 18 मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली.  आफताब आणि श्रद्धा 8 मेपासून दिल्लीतल्या महरौली परिसरात भाड्याने घर घेऊन रहात होते. त्याआधी दोघं मुंबईत रहात होते. 18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबचं भांडण झालं. यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. ते ठेवण्यासाठी त्याने 300 लीटरचं नवीन फ्रिज विकत घेतलं. दररोज काही तुकडे तो महरौलीच्या जंगलात फेकून येत होता. श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली.