Shraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर

Shraddha Murder Case: आतापर्यंत 11 गोष्टींचा खुलासा झाला आहे, पण तरीही Aaftab Poonawala विरुद्ध ठोस पुरावा मिळवण्याचं दिल्ली पोलिसांसमोर का येतेय अडचण, वाचा

Updated: Nov 29, 2022, 04:44 PM IST
Shraddha Murder Case : श्रद्धा आफताबला सोडणार होती पण... मोठा खुलासा आला समोर title=

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडात मोठा खुलासा समोर आलाय. श्रद्धा आफताबला (Aaftab Poonawala) सोडणार होती. 3 किंवा 4 मेला या दोघांमध्ये वेगवेगळं राहण्यासंदर्भात निर्णय झाला होता. पण आफताबला श्रद्धाचा हा निर्णय आवडला नव्हता. श्रद्धासोबतच्या ब्रेकअपच्या भीतीनेच आफताबनं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. दिल्ली पोलिसांकडे (Delhi Police) कोणताही साक्षीदार नसल्यानं मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. 

दरम्यान आफताबची नार्को टेस्ट (Narco Test) 1 डिसेंबरला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी दिल्ली पोलिसांना कोर्टाने परवानगीसुद्धा दिलीय.  बम्बल डेटिंग अॅपमधूनही (Bumble Dating App) पोलिसांना आवश्यक ती माहिती मिळालेली नाही. तसंच दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत व्हॉट्सअॅप, गुगल, झोमॅटो तसंच इन्स्टाग्राम आणि फेसबुककडूनही आफतबाची माहिती मागवली आहे.

श्रद्धा हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेले खुलासे

1-  मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाच्या शरीराचे आतापर्यंत 13 तुकडे हस्तगत करण्यात आले आहेत. जबडाही सापडला
2- आफताब आणि श्रद्धा रहात असलेल्या रुमच्या बाथरुम आणि किचनमध्ये रक्ताचे काही डाग आढळले असून त्याचे सँम्पल घेण्यात आहेत.
3- दिल्ली पोलिसांनी काही शस्त्र जप्त केली आहेत. ही शस्त्र जंगल आणि आफताबच्या फ्लॅटमध्ये सापडली आहेत. कोणत्या शस्त्राने शरीराचे तुकडे करण्यात आले आहेत, याचा निर्णय अहवालानंतर येणार आहे. 
4- आफताब आणि श्रद्धाला दिल्लीत फ्लॅट मिळवून देणाऱ्या बद्री या एजंटची आतापर्यंतची भूमिका संशयास्पद
5 - दिल्ली पोलिसांकडे एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, ही दिल्ली पोलिसांसमोरची सर्वात मोठी अडचण आहे
6 - दिल्ली पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून काही कपडे जप्त केले असून ते CSFL कडे तपासासाठी पाठवण्यात आले आहेत, याचा अहवाल येणं बाकी आहे
7 - सप्टेंबरमध्ये जेव्हा आफताबला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, त्यावेळी श्रद्धाच्या शरीराचे काही तुकडे फ्लॅटवरच होते, आणि आफताब पोलिसांची दिशाभूल करत होता
8 -  श्रद्धाची हत्या रागाच्या भरात झाली असल्याचं आफताब सांगत असला तरी ही पूर्ण योजना बनवून केलेली हत्या असल्याचा पोलिसांचा दावा आहे
9 - आफतबाने श्रद्धा हत्या प्रकरणाची कोणतीही माहिती आई-वडिलांना दिली नाही, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचा पोलिसांचा दावा 
10 - दिल्ली पोलिसांनी गूगल pay, pay tm, bumble dating app, facebook, इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे पत्र लिहून आफताबच्या अकाऊंटच्या डिटेल्स मागवल्या आहेत. काही डिटेल्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. गुगल ब्राऊजिंगमध्ये काही संशयास्पद लिंक सापडल्य आहेत, ज्या आफताबने सर्च केल्या होत्या.
11 -  आफताब पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला विचारपूर्वक आणि वेगवेगळी उत्तर देतोय

1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट
आफताब पुनावालाची 1 डिसेंबराल नार्को टेस्ट केली जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे निवेदन दिलं आहे. याआधी 5 डिसेंबरला नार्को टेस्ट करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. आफताबची पॉलीग्राफ टेस्टही (Poligraph Test) पूर्ण झाली आहे. श्रद्धा वालकर बेपत्ता झाल्याची तक्रार मुंबईत करण्यात आली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आफताबच्या चौकशीत मुंबई पोलिसांची मदतही घेतली होती. 

12 नोव्हेंबरला आफताब अटकेत
आफताब पुनावालाने 18 मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली.  आफताब आणि श्रद्धा 8 मेपासून दिल्लीतल्या महरौली परिसरात भाड्याने घर घेऊन रहात होते. त्याआधी दोघं मुंबईत रहात होते. 18 मे रोजी श्रद्धा आणि आफताबचं भांडण झालं. यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. ते ठेवण्यासाठी त्याने 300 लीटरचं नवीन फ्रिज विकत घेतलं. दररोज काही तुकडे तो महरौलीच्या जंगलात फेकून येत होता. श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली.