Rain Of Coins: जमिनीखाली किंवा भिंतीत खजाना लपवल्याच्या बातम्या आपण अनेकवेळा वाचल्या असतील. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. एक जुनं घर बुलडोझरने (Bulldozer) पाडण्यात येत होतं, तेव्हा एक अशी घटना घडली की पाडकाम तात्काळ थांबवण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींनी तिथे चांदीच्या शिक्क्यांचा (Silver Coins) पाऊस पडत असल्याची माहिती दिली. उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बदायू (Badaun) इथं ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
बदायूमध्ये नगरपालिकेतर्फे एका जर्जर झालेल्या घराचं पाडकाम सुरु होतं. यात भिंत पाडत असताना त्यातून चांदीचे शिक्के खाली पडू लागले. हा प्रकार बघताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी शिक्के गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली. एका शिक्क्याचं वजन साधारण 10 ग्रॅम असल्याचं सांगण्यात आलं असून त्याची किंमत एक हजार रुपये इतकी आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार भिंतीतून 160 पेक्षा जास्त शिक्के निघाले. ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. गर्दी वाढत गेल्याने पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तिथे पोहोचला आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. यानंतर लोकांनी लंपास केलेले चांदीचे शिक्केही गोळा करण्यात आले.