Simplest Aadhar Download Processs without regestered mobile number: तुम्ही तुमचं आधार कार्ड रजिस्टर्ड मोबाईल नंबर नसल्यासही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकतात. ज्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही अशांसाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. जाणून घ्या अतिशय सोपी पद्धत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Aadhaar Card Latest News) आधारकार्डधारकांसाठी सर्वात महत्त्वाची आणि चांगली बातमी. आता तुम्ही विना रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचं आधार कार्ड डाऊनलोड करू शकतात. आधार कार्ड जारी करणारी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच (UIDAI) ने याबाबत मोठी घोषणा केली आहे.


हे महत्त्वाचं पाऊल त्यांच्यासाठी उचलण्यात आलं आहे ज्यांचे मोबाईल नंबर अजूनही रजिस्टर्ड नाहीत. याआधी तुम्हाला आधार डाऊनलोड करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाईल नंबरचीच गरज भासायची. आता जाणून घेऊयात विना रजिस्टर्ड मोबाईल कसं डाऊनलोड कराल आधार कार्ड.  


आधार डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत 


  • यासाठी तुम्हाला सर्वात आधी UIDI च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तिथे 'माय आधार'वर क्लिक करा.  

  • यानंतर 'ऑर्डर आधार पिव्हीसी कार्ड' यावर क्लिक करा

  • तुम्हाला 12 अंकाचा आधारकार्ड नंबर टाकण्यास सांगितलं जाईल 

  • याठिकाणी तुम्ही आधार क्रमांकाशिवाय 16 अंकी व्हर्चुअल आयडेंटिफिकेशन (VID) देखील टाकू शकतात

  • यानंतर तुम्हाला दाखवला गेलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल 

  • जर तुम्ही विना मोबाईल नंबर आधार डाऊनलोड करू इच्छिता, तर माझा 'मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही' या विकल्पावर क्लिक करा 

  • यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा (वैकल्पिक) किंवा जो नंबर नोंदणीकृत नाही असा टाकावा लागेल

  • यानंतर 'OTP सेंड करा' यावर क्लिक करा 

  • तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल 

  • OTP टाकून अटी आणि शर्थी या चेकबॉक्सवर क्लिक करावं लागेल. यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा 

  • आता तुम्हाला एका नव्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल 

  • रीप्रिंटिंगच्या व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला प्रिव्ह्यू आधार लेटर या विकल्पावर जावं लागेल. 

  • यानंतर मेक पेमेंट हा ऑप्शन निवडा 


Simplest Aadhar Download Processs without regestered mobile number